🕒 1 min read
वाशीम : जिल्ह्यात काही दिवसांत अतवृष्टी, पुरामुळे पिकांचे तसेच घरांचे नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या आढावा बैठकीत दिल्या. तसेच सततच्या पावसामुळे झालेल्या सोयाबीन पिकाच्या नुकसानीची भरपाई मिळावी, यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी हृषिकेश मोडक, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कळमकर, पशुसंवर्धन उपआयुक्त बोरकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री देसाई म्हणाले, जिल्ह्यातील ज्या मंडळांमध्ये अतवृष्टी झालेली आहे, तेथील नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत. गेल्या काही दिवसांत सतत पाऊस पडत आहे. तसेच आगामी काही दिवसांत पाऊस पडण्याचा अंदाज आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील सोयाबीन पिकाचे नुकसान होत असून, झाडावरच शेंगांना अंकुर फुटत असल्याचे दिसून येत आहे. या नुकसानीची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच कृषिमंत्री दादाजी भुसे यांना देवून जिल्ह्यातील शेतकर्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री म्हणाले. जिल्हा प्रशासनाने या नुकसानीचा अंदाज घेवून प्राथमिक आकडेवारी तातडीने कळविण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
पावसामुळे व पुरामुळे काही ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. या नुकसानीचे पंचनामे प्राधान्याने करून देय असलेली नुकसान भरपाई संबंधितांना त्वरित उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करावी. जेणेकरून नागरिकांना आपल्या घराची दुरुस्ती करण्यासाठी मदत उपलब्ध होईल. तसेच पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना सुद्धा नियमानुसार तातडीने मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना पालकमंत्री देसाई यांनी केल्या.
तसेच पुढील आठवड्यात मुख्य सचिवांसमवेत विशेष बैठक आयोजित करून जिल्ह्यातील विविध शासकीय विभागात रिक्त असलेली पदे भरण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे. विशेषत: जिल्हा परिषदेतील प्रमुख रिक्त पदे तातडीने भरण्याबाबत यावेळी चर्चा करणार असल्याचे पालकमंत्री देसाई म्हणाले.
आरटी-पीसीआर प्रयोगशाळा उभारणीचा आढावा
जिल्ह्यात उभारण्यात येत असलेल्या आरटी-पीसीआर प्रयोगशाळा उभारणीच्या कामाचा आढावाही देसाई यांनी घेतला. प्रयोगशाळेचे काम अंतिम टप्प्यात असून, आगामी दहा दिवसांत ही प्रयोगशाळा कार्यान्वित होईल, यासाठी सूक्ष्म नियोजन करून त्याप्रमाणे कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.
जिल्हा परिषद अध्यक्ष ठाकरे म्हणाले, अतवृष्टीमुळे मंगरूळपीर तालुक्यातील कवठळ येथील दोन तलाव फुटल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच अनेक शेतकर्यांचे पशुधन वाहून गेले आहे. या नुकसानीचे पंचनामे त्वरित पूर्ण करून संबंधित शेतकर्यांना मदत उपलब्ध करून देण्याची कार्यवाही जलद गतीने करावी. तसेच जिल्हा परिषदेतील अनेक अधिकार्यांची पदे रिक्त असल्याने कामकाजात अडथळे येत असून, सदर पदे त्वरित भरण्याबाबत पाठपुरावा करावा.
महत्वाच्या बातम्या :-
- दीपिकाची ५ तासांपासून चौकशी सुरूच, तर धर्मा प्रोडक्शनच्या क्षितिज प्रसादला अटक
- मराठा समाजाच्या हितासाठी सर्वांना एकत्र यावेच लागेल – शिवेंद्रसिंहराजे भोसले
- नाशिक मध्ये मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक
- कर्जतच्या उपकारागृहातील एकाचवेळी २७ कैद्यांना कोरोनाची लागण
- प्रशासकीय अनागोंदी टाळण्यासाठी अन कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी का होतेय हे पद भरण्याची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
