मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणावर सुरु झालेल्या तपासाने वेगळं वळण घेतलं असून आता अंमली पदार्थांच्या सेवनावरून एनसीबीने मोठी पावले उचलली आहेत. सुशांतची तथाकथित प्रेयसी व अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविकला अटक झाल्यानंतर या प्रकरणात दिग्गज अभिनेत्रींचे नाव समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
काल, अभिनेत्री रकुल प्रीतच्या चौकशीनंतर आज दीपिका पादुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांची कसून चौकशी केली जात आहे. या तिघींनी अंमली पदार्थाच्या सेवनाचे आरोप फेटाळून लावले आहेत. तर, सुशांतला अंमली पदार्थ सेवनाची सवय होती असा धक्कादायक खुलासा साराने केला आहे.
दरम्यान, धर्मा प्रोडक्शनशी निगडीत क्षितिज प्रसादला अटक करण्यात आली आहे. एनसीबीने तब्बल २४ तास त्याची चौकशी केली. यानंतर मुंबईतील चार ठिकाणी छापे देखील टाकण्यात आले आहेत. दीपिकाच्या चौकशीला सुमारे ५ तास होऊन देखील एनसीबी अजूनही तिची चौकशी करत आहे.
महत्वाच्या बातम्या :-
- बारामतीत अजित पवारांच्या निवास्थाना बाहेर मराठा समाजाचे ‘ढोल बजाओ’ आंदोलन
- प्रसिद्ध कीर्तनकार रामदास महाराज कैकाडी यांच्या निधनाने नगरवर शोककळा
- अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी प्रशांत गडाख यांच्या प्रयत्नाने नेवासा तालुक्यासाठी दोन केंद्र
- नगरमध्ये डाव्या पक्षांच्यावतीने शेतकरी व कामगार विरोधी विधेयकाचा निषेध
- मोदींनी भेट नाकारल्याचा उल्लेख म्हणजे केवळ राजकारण: खा. संभाजीराजे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

