Share

प्रशासकीय अनागोंदी टाळण्यासाठी अन कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी का होतेय हे पद भरण्याची मागणी   

Published On: 

खामगाव : महसूल उपविभागातील प्रशासकीय अनागोंदी टाळण्यासाठी व कोरोना संसर्गजन्य परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी रिक्त असलेले उपविभागीय अधिकारी पद तातडीने भरण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे अमरावती विभागीय समन्वयक धनंजय देशमुख यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व बुलडाणा जिल्हा संपर्कमंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात त्यांनी दिलेल्या पत्रामध्ये नमूद आहे की, खामगाव येथील उपविभागीय महसूल अधिकारी यांची शासनाचे वतीने इतरत्र बदली करण्यात आली आहे. त्यामुळे गेले अंदाजे तीन ते चार आठवड्यांपासून येथील पद रिक्त आहे.

या कारणास्तव प्रशासकीय व्यवस्थापन ढेपाळले आहे. तसेच कोरोना संसर्गात मोठय़ाप्रमाणावर वाढ झाली असून, रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. या कारणामुळे खामगाव परिसरात प्रशासकीय स्तरावर योग्य निर्णय घेण्यासाठी सक्षम उपविभागीय अधिकारी नियुक्त करणे अत्यंत गरजेचे आहे. या यासंदर्भात अत्यंत गांभियार्ने दखल घेऊन उपविभागीय अधिकारी पद तातडीने भरावे, अशी मागणीही धनंजय देशमुख यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!