Share

नाशिक मध्ये मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक

Published On: 

नाशिक : राज्यात आरक्षणाचा वाद पुन्हा चिघळत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणाला समाजातील नागरिकांसह अनेक लोकप्रतिनधींचा देखील पाठिंबा मिळत आहे.

खासदार संभाजीराजे छत्रपतींनी मराठा समाजाला मिळालेले आरक्षण टिकवण्यासाठी गट-तट व पक्षभेद विसरून महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी एकत्र यावे यासाठी आवाहन केले होते. खासदार संभाजीराजेंच्या आवाहनाला अनेक खासदारांनी पाठिंबा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून मराठा आरक्षणावर लवकरात लवकर तोडगा निघावा यासाठी भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं होत. मात्र, मोदींनी अजूनही भेटीची वेळ न दिल्याचे समजत आहे. यावरून खासदार संभाजीराजेंनी खुलासा केला आहे.

याचदरम्यान आता मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सरकारने ठोस निर्णय घ्यावा या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर ‘ढोल बजाव’ आंदोलन करण्यात आले कोर्ट कॉर्नरपासून पदयात्रेने या आंदोलनाला सुरुवात झाली. तर याच अगोदर संगमनेरमध्ये रास्ता रोको आंदोलन तर सोलापूर मध्ये शालेय मुलांकडून दंडवत घालून आंदोलन करण्यात आले होते.

दरम्यान आज मराठा क्रांती मोर्चाची नाशिक मध्ये महत्वाची बैठक पार पडत आहे. दिवसभर चालणाऱ्या या बैठकीला खासदार संभाजीराजे छत्रपती देखील उपस्थित आहेत. या बैठकीदरम्यान मराठा समाजाच्या भावना समजून घेणार असल्याचे संभाजी राजेंनी सांगितले आहे. यासोबतच येत्या काळात होणाऱ्या आंदोलनांची दिशा देखील आज या बैठकीत ठरवली जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!