सातारा : मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर महाराष्ट्रात मराठा समाजात संतापाची लाट उसळली असून, पुढील दिशा ठरविण्यासाठी पुण्यात मराठा विचार मंथन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला छत्रपती घराण्याचे वंशज खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना शिवसंग्राम संघटनेचे नेते माजी आमदार विनायक मेटे यांनी दोघांच्या निवासस्थानी जाऊन आमंत्रण देत मराठा समाजाला दिशा देण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी विनंती केली.
ज्या मराठा समाजामूळे आम्ही मोठे झालो. ज्या समाजाचा घटक आहोत त्यांच्या सोबत उभं राहणार आणि पुण्यातील बैठकीला उपस्थित राहणार असून जो निर्णय घेतला जाईल त्यानुसार पुढील वाटचाल करणार असल्याच मत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केल आहे.
पहा व्हिडिओ :
https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/537942830350686/
महत्वाच्या बातम्या :
- प्रसिद्ध कीर्तनकार रामदास महाराज कैकाडी यांच्या निधनाने नगरवर शोककळा
- अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी प्रशांत गडाख यांच्या प्रयत्नाने नेवासा तालुक्यासाठी दोन केंद्र
- नगरमध्ये डाव्या पक्षांच्यावतीने शेतकरी व कामगार विरोधी विधेयकाचा निषेध
- मोदींनी भेट नाकारल्याचा उल्लेख म्हणजे केवळ राजकारण: खा. संभाजीराजे
- दीपिकाची ५ तासांपासून चौकशी सुरूच, तर धर्मा प्रोडक्शनच्या क्षितिज प्रसादला अटक


