Share

‘महान धावपटू मिल्खा सिंह यांची प्रकृती स्थिर ; अफवा पसरवू नका’

Published On: 

नवी दिल्ली : भारताचे महान धावपटू मिल्खा सिंह यांना कोरोनाची लागण झाल्याचं 20 मे रोजी समोर आलं होतं. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. त्यांच्यावर PGIMER चंदीगढमध्ये उपचार सुरु आहेत. मिल्खा सिंग यांनी शनिवारी कोरोना व्हायरसवर मात केली आणि त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलं होतं. मात्र, गुरुवारी त्यांची प्रकृती आणखी बिघडल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आज त्यांच्या प्रकृती स्थिर असल्याची माहिती क्रीडामंत्री किरण रिजिजू यांनी दिली. तसेच, देशाच्या महान खेळाडूबद्दल अफवा पसरवू नका, असे आवाहनही त्यांनी केलं आहे.

कोरोनावर मात केल्यानंतर मिल्खा सिंग हे ऑक्सिजन सपोर्टवर होते. त्यांच्या कुटुंबीयांच्या विनंतीनंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. दरम्यान, गुरूवारी अचानक पुन्हा मिल्खा सिंग यांची तब्येत बिघडली. गुरूवारी दुपारी ऑक्सिजन लेव्हल अचानक कमी झाल्यानं त्यांना चंडिगढ येथील पीजीआयच्या कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्या ठिकाणी त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थीर आहे.

भारताचे महान धावपटू मिल्खा सिंह यांना कोरोनाची लागण झाल्याचं 20 मे रोजी समोर आलं होतं. ते चंदीगडमध्ये आपल्या घरी आयसोलेट होते. मात्र त्यांना 24 तारखेला दवाखान्यात दाखल करण्यात आलं होतं. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना मोहालीच्या फोर्टिज हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं. फ्लाइंग सिख नावानं प्रसिद्ध असलेल्या मिल्खा सिंह यांचं वय 91 वर्ष आहे. त्यांच्या पत्नीनं त्यांना कोरोना झाला असल्याचं स्पष्ट केलं होते.

https://twitter.com/KirenRijiju/status/1401103721308704770?s=20

दरम्यान आज सोशल मीडियावर मिल्खा सिंग यांच्या प्रकृतीबद्दल उलट-सुलट चर्चा आणि पोस्ट येऊ लागल्या. त्यामुळे, देशाच्या क्रीडामंत्र्यांनीच ट्विट करुन मिल्खा सिंग यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली. मिल्खा सिंग यांची प्रकृती स्थीर असून त्यांच्याबद्दल अफवा पसरवू नका. देशाच्या महान खेळाडूला लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करा, असे ट्विट रिजिजू यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!