🕒 1 min read
पुणे : कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत अधिक रुग्ण नोंदवले जात आहेत. दरम्यान, पुणे शहरात एप्रिल महिन्यात दररोज पाच ते सात हजार रुग्णांची वाढ होत होती. यामुळे पुणे शहरासह जिल्ह्यासाठी देखील ही बाब गंभीर होती. मात्र, आता कोरोना रुग्णांच्या आकड्यात मोठी घट होत असून कोरोना बाधितांची संख्या देखील अधिक आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये नव्या कोरोना रुग्णांचा आकडा हा १ हजारांच्या खाली आहे. तर, पुण्यात या लाटेतील नीचांकी १८० रुग्णांची नोंद एका दिवसात करण्यात आली होती. मात्र, या आकड्यात काहीशी वाढ झाली असल्याने ऍक्टिव्ह रुग्णांचा आकडा आटोक्यात येण्यास अधिक वेळ लागत आहे.
दरम्यान, पुणे शहरात आज नव्याने ३८० कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ७१ हजार ९५७ इतकी झाली आहे. शहरातील ६४१ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ५९ हजार ०१५ झाली आहे. पुणे शहरात आज एकाच दिवसात ६ हजार ९०९ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता २५ लाख ३३ हजार १३० इतकी झाली आहे.
पुणे कोरोना अपडेट : शनिवार दि.०५ जून,२०२१
◆ उपचार सुरु : ४,५६३
◆ नवे रुग्ण : ३८० (४,७१,९५७)
◆ डिस्चार्ज : ६४१ (४,५९,०१५)
◆ चाचण्या : ६,९०९ (२५,३३,१३०)
◆ मृत्यू : १८ (८,३७९)#PuneFightsCorona #CoronaUpdate pic.twitter.com/VS7DF7xMaf— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) June 5, 2021
पुणे शहरात उपचार घेणाऱ्या ४ हजार ५६३ रुग्णांपैकी ७०९ रुग्ण गंभीर तर १,३४७ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे महापालिका हद्दीत नव्याने १८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ८ हजार ३७९ इतकी झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- महागाईचा भडका ; कॉंग्रेसने केले PPE किट घालून भाजप कार्यालयाबाहेर आंदोलन
- कर्ज मंजूर करण्याचे आमिष दाखवून वकीलासह बेरोजगारांना गंडविणाऱ्यास न्यायालयीन कोठडी
- ट्विटरवर केंद्राचा दबदबा ; इशारा देताच मोहन भागवतांसह अन्य नेत्यांचे ब्ल्यू टीक परतले
- ‘तिघांचा हेतू प्रामाणिक असेल, तोपर्यंत महाविकास आघाडी टिकेल’ ; मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान
- उत्पन्न वाढवण्यासाठी पर्यावरणाचा समतोल महत्त्वाचा, भाजप आमदाराचा शेतकऱ्यांना सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
