मुंबई : कोरोना रोगाने गेल्यावर्षीपासून देशासह जगभरात थैमान घातला आहे. अनेक देश या रोगातून सावरत असून भारताला दुसऱ्या लाटेचा फटका बसला. कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्याहून अधिक भयंकर होती. या लाटेचे सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रात दिसून आले. राज्यातील स्थिती आता आटोक्यात येत असून अद्यापही अनेक जिल्ह्यांमध्ये चिंता कायम आहे.
अशातच, काहीसा दिलासादायक माहिती आता समोर येत आहे. कोरोना स्थिती आटोक्यात असलेल्या जिल्ह्यांमध्ये आणि शहरांमध्ये अनलॉकची सुरुवात झाली असताना कोरोना रुग्णवाढीची स्थिती चिंताजनक असल्याने कडक निर्बंध कायम ठेवण्यात आले होते. तर, कोल्हापूर जिल्ह्याचा आढावा खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतला होता. आता कोल्हापूर, सातारा, पुणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांमध्ये कोरोनाची स्थिती काहीशी आटोक्यात येण्यास सुरुवात झाल्याचं नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीमधून स्पष्ट झालं आहे.
जाणून घ्या या सहा जिल्ह्यांमधील सध्याची स्थिती –
कोल्हापूर –
संसर्ग दर- 13.77 टक्के
व्यापलेल्या खाटाचे प्रमाण- 54.78 टक्के
पुणे –
संसर्ग दर- 9.88 टक्के
व्यापलेल्या खाटाचे प्रमाण- 10.90 टक्के
सातारा –
संसर्ग दर- 8.91 टक्के
व्यपालेल्या खाटाचे प्रमाण- 37.32 टक्के
रत्नागिरी –
संसर्ग दर- 11.90 टक्के
व्यापलेल्या खाटाचे प्रमाण- 42.19 टक्के
रायगड –
संसर्ग दर- 12.77 टक्के
व्यपलेल्या खाटा- 14.6 टक्के
सिंधुदुर्ग –
संसर्ग दर- 9.06 टक्के
व्यापलेल्या खाटाचे प्रमाण- 55.20 टक्के
महत्वाच्या बातम्या
- राऊत म्हणाले, ‘आम्ही सर्टिफाईड गुंड’; आता चंद्राकांतदादांनी दिलं जशास तसं प्रत्युत्तर !
- गोपीनाथ मुंडे असते तर अशा पद्धतीने ओबीसींचे आरक्षण रद्द होऊच दिले नसते
- ‘आंदोलन करायला भाजप आजही घाबरली नाही आणि उद्याही घाबरणार नाही’- आशिष शेलार
- ‘शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष एकत्र आले तर पंढरपूर सारखा चमत्कार घडेल’; भाजप नेत्याचा टोला
- धक्कादायक! आरटीपीसीआर टेस्ट ट्यूबमध्ये आढळला डास
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

