पुणे : अयोध्येतील राम मंदिराच्या ट्रस्टने जमीन घोटाळा केल्याच्या आरोपामुळे देशभरात खळबळ उडाली होती. याच मुद्यावरून सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधण्यात आला होता. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी भाजप युवा मोर्चाच्या वतीने शिवसेना भवनावर ‘फटकार’ मोर्चा काढला होता. यावेळी शिवसैनिक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच धुमश्चक्री उडाली.
भाजपने शिवसेना भवनावर फटकार मोर्चा काढून निषेध करणार होते. भाजपचे युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोर्चेकरी जमा झाल्यानंतर शिवसैनिकांनी शिवसेना भवनाच्या परिसरात गर्दी केली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरवातीला बाचाबाची झाली नंतर याच रुपांतर हाणामारीत झाले.
त्यानंतर यावरून आता जोरदार राजकारण तापायला सुरवात झाली आहे. दरम्यान, या वादावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी देखील आपली रोखठोक प्रतिक्रिया माध्यमांना दिली आहे. मराठा माणसांच्या अस्मितेसाठी आम्ही सर्टिफाईड गुंड आहोत, असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे. यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
‘गुंडगिरीला एवढं समर्थन मिळाणार असेल तर ठीक आहे. जसं त्यांना तोडांचे बार मारता येतात तसं आम्हालाही ते उडवता येतात. पण मला वाटतं हा विषय इथे संपवावा लागेल. त्यांनीच एके ठिकाणी काल वक्तव्य केलं त्याचं मी स्वागत केलं. जे काही झालं ते संपलं. पण अशा पद्धतीनेच जर चालू राहणार असेल तर भाजपाचे कार्यकर्ते पक्षासाठी, मोदींसाठी, रामासाठी वाटेल ते करायला तयार असतात. त्यामुळे अशी भाषा वापरु नका,’ असा सल्ला वजा इशारा देखील चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना दिला आहे. त्यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला.
नेमकं काय म्हणाले होते संजय राऊत ?
‘होय, शिवसेना गुंडगिरी करते. मात्र, सत्तेचा माज शिवसेना करते हे चुकीचं आहे. सत्तेचा माज असता तर काल अजून वेगळा राडा झाला असता. शिवसेना भवन हे मराठा माणसासाठी, राज्यासाठी अस्मितेचं स्थान आहे. याच भवनात बसून बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रावर राज्य केलं. त्या वास्तूच्या दिशेने कोणी चालून आलं तर होय, आम्ही गुंड आहोत. आम्ही गुंड आहोत यासाठी आम्हाला कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. महाराष्ट्राच्या अस्मितेच्या बाबतीत, हिंदुत्वासाठी आम्ही सर्टिफाईड गुंड आहोत. त्यावेळी मराठी माणसाने केंद्रविरोधात गुंडगिरी केली म्हणून मुंबई महाराष्ट्रात राहिली,’ असं संजय राऊत यांनी आवर्जून नमूद केलं.
पुढे त्यांनी तुकाराम महाराजांच्या काही ओळी देखील सांगितल्या. ‘पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा असं तुकारामांनी सांगितलंय. ही गुंडगिरी आम्ही करत राहिलो म्हणून महाराष्ट्रात आणि मुंबईत मराठी माणसाचा आवाज आहे. तो आवाज दाबाल तर गुंडगिरी करणार. विरोधकांना आंदोलनाचा हक्क आहे, पण आमच्या श्रद्धास्थानाकडं वाकडी नजर टाकलीत तर असंच होईल. त्यामुळे शिवसेना भवनाबाहेर कोणीही आंदोलन करायचं नाही. शिवसेना भवन अपवाद आहे.’ असं देखील राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- पवारांच्या लेकीची ‘पॉवर’बाज कामगिरी! लोकसभेत सर्वाधिक प्रश्न विचारण्यात सुप्रिया सुळे अव्वल
- ‘एक दुजे के वास्ते’ लग्नानंतर सोनालीचे सोनेरी क्षण कॅमेऱ्यात कैद
- ‘आंदोलन करायला भाजप आजही घाबरली नाही आणि उद्याही घाबरणार नाही’- आशिष शेलार
- ‘शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष एकत्र आले तर पंढरपूर सारखा चमत्कार घडेल’; भाजप नेत्याचा टोला
- धक्कादायक! आरटीपीसीआर टेस्ट ट्यूबमध्ये आढळला डास
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

