🕒 1 min read
मुंबई:- राज्यपाल विरुद्ध ठाकरे सरकार हा वाद आणखी गडद होताना दिसत आहे. आता तर राज्यपालांच्या हवाई प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगीच दिली नसल्याचं समोर आलं आहे. आश्चर्य म्हणजे राज्यपाल कोश्यारी विमानात बसल्यानंतर त्यांना परवानगी नसल्याचं कळलं. त्यामुळे राज्यपालांवर विमानातून उतरुन परत राजभवनावर येण्याची नामुष्की ओढावली आहे.
राज्यपाल विरुद्ध महाराष्ट्र सरकार हा वाद पहिल्या दिवसापासून सुरु आहे. मग ते शपथविधी दरम्यान घेतलेल्या नेत्यांच्या नावावरुन असो वा आता रखडलेल्या 12 आमदारांच्या नियुक्तीवरुन असो, हा वाद वाढतच आहे. आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे उत्तराखंडकडे जात होते. त्यावेळी ते सरकारी विमानाने निघाले होते. मात्र राज्यपालांच्या या प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगीच दिली नसल्याचं समोर आलं आहे.
दरम्यान, आता ह्या सर्व प्रकारावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘राज्यपालांचं विमान सरकारच्या माध्यमातून नाकारलं असेल तर हे दमनकारी आहे. लोकशाही व्यवस्थेत हे घडणं योग्य नाही. सरकारकडून असं घडलं असेल तर त्यानी क्षमा मागून हा विषय इथेच थांबवावा. कोणत्या अधिकाऱ्याकडून घडलं असेल तर त्याला तात्काळ बडतर्फ करण्यात यावं’, अशी मागणी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतिपथावर
- बीडमध्ये विजेचे दोन बळी; कर्नाटकात कामासाठी गेलेला तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
- जाणून घ्या भाजपा खासदारांनी सांगितलेला ‘नरेंद्र मोदी’ नावाचा फुल फॉर्म !
- केंद्र सरकार Twitter विरोधात आक्रमक; काही बड्या अधिकाऱ्यांना अटक होण्याची शक्यता
- लोकोपयोगी कामांसाठी उदयनराजेंची धडपड; केंद्रीय मंत्र्यांच्या भेटींचा लावला धडाका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
