बीड : बीड जिल्ह्यातील दोन जणांचा बुधवारी विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. माजलगावातील टाकरवण येथे वीज दुरुस्तीच्या कामादरम्यान शॉक लागून गोकुळ गरड नावच्या २२ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला आहे. तर केजमध्ये स्टार्टरमध्ये करंट उतरल्याने भीमराव दशरथ गोरे या ५५ वर्षीय शेतकऱ्याचा शॉक लागून मृत्यू झाला आहे.
केज तालुक्यातील बनसारोळा येथे भीमराव दशरथ गोरे यांची शिवारातील सर्व्हे नं. ६/१ मध्ये जमीन आहे. बुधवारी ते शेतातील विहिरीवर मोटार सुरू करण्यासाठी गेले होते. दरम्यान, मोटारच्या स्टार्टरमध्ये करंट उतरल्याने शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला. सकाळी शेजारील शेतकऱ्यांना ही घटना कळाली. युसूफवडगाव ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आनंद झोटे, विजय आटोळे, पोलिस नाईक पांडुरंग वाले यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला.
दुसऱ्या एका घटनेत विजेच्या तारा आणि पोलचे काम करण्यासाठी आपल्या मामासह कर्नाटकला गेलेल्या माजलगाव तालुक्यातील टाकरवण येथील तरुणाला मेन लाइनच्या क्रॉस तारांना चिकटल्याने शॉक लागला. गोकुळ अंकुश गरड असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेत विजेचा जोरदार धक्का बसल्याने गोकुळचा पोलवरून खाली पडून मृत्यू झाला. ही घटना चिकोडी तालुक्यातील चांदणवाडी गावात घडली. विषेश म्हणजे या घटनेत उंचावरून गेलेल्या क्रॉस लाइनमध्ये विजेचा प्रवाह असताना सर्व विजेचा प्रवाह बंद करण्यात आल्याची माहिती देऊन अधिकाऱ्यांनी तरुणाला विजेच्या पोलवर चढवले होते.
महत्वाच्या बातम्या
- सिनेस्टाईल खूनाचा उलगडा; दारू पाजली, गळा आवळला, पेट्रोल टाकून गाडी दरीत लोटली
- जालनेकरांची खड्डेमय रस्त्यातून होणार सुटका; आमदार कैलास गोरंट्याल यांच्या प्रयत्नांना यश
- “वाल्मीची पुनर्रचना करून व्यवस्थापन जलसंपदा विभागाकडे द्यावे”
- खिशातील बिड्यांच्या ‘क्लू’मुळे पोलिसांना सापडला मारेकरी
- जालन्यातील सिडकोचे प्रकल्प रद्द करू नये; आमदार अंबादास दानवेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
