औरंगाबाद : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत (एमजेपी) शहराच्या जलयोजनेचे काम सुरू करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत कंत्राटदाराने जायकवाडी ते शहरापर्यंत सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे. जायकवाडीतील मुख्य हेडवर्कसह शहरात उंचीवरील ४९ व जमिनीवरील ४ जलकुंभांची कामे महिनाभरात सुरू करावी, असे आदेश महापालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी दिले आहेत. या योजनेतून छावणी बोर्डालाही पाणी देण्याचा विचार सुरू आहे, त्यासंदर्भातही आयुक्तांनी संबधितांना निर्देश दिले.
शहराच्या नवीन जलयोजनेचे काम एजेपीच्या देखरेखीखाली केले जात असून योजनेचे काम हैद्राबादच्या जीपीव्हीआर कंपनीकडून केले जात आहे. या कामाचा आढावा घेतल्यानंतर पालिका आयुक्त पांडेय यांनी जलयोजनेच्या कामासह पाणीपुरवठ्याचे काम तातडीने सुरू करण्यासंदर्भात निर्देश दिले. संतुलित जलकुंभ व जलशुद्धीकरण केंद्राचे बांधण्यात येणाऱ्या ४९ उंचीवरील (ईएसआर) व जमिनीवरील चार (जीएसआर) जलकुंभांचे काम एक महिन्यात सुरू करावे असे आदेशही आयुक्तांनी यावेळी दिले. या बैठकीत जलयोजनेसंदर्भात केल्या जाणाऱ्या विविध कामांबाबत देखील सखोल चर्चा करण्यात आली. यावर जायकवाडी हेड वर्क, पाण्याचे जलकुंभ, संतुलित जलकुंभ, जलशुद्धीकरण केंद्रांचे काम एक महिन्यात सुरू करण्याचे आदेश आयुक्त पांडेय यांनी दिले.
सहा जलकुंभांचे काम प्रगतीपथावर
शहरासाठी राबविल्या जाणाऱ्या नवीन जलयोजनेतून छावणी बोर्डाला देखील पाणी देण्याचा विचार केला जात आहे. या प्रमुख मुद्यावरही बैठकीत सविस्तर चर्चा झाली. तसेच जायकवाडी येथे जोड पुल, जायकवाडी ते नक्षत्रवाडी, नक्षत्रवाडी ते शहर येथे जल शुद्धीकरण केंद्र व संतुलित जलकुंभाचे काम सुरू करण्यात येणार आहे. सध्या ६ ठिकाणी जलकुंभाचे काम प्रगतीपथावर आहे, अशी माहिती एमजेपीच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली.
महत्वाच्या बातम्या
- सिनेस्टाईल खूनाचा उलगडा; दारू पाजली, गळा आवळला, पेट्रोल टाकून गाडी दरीत लोटली
- उदयनराजेंना मिळणार गडकरींची साथ; महामार्गाच्या सहा पदरीकरणास लवकरच होणार सुरूवात
- भारतीय संघासाठी आनंदाची बातमी; अक्षर पटेल दुसऱ्या कसोटीसाठी फिट
- “इंग्लंड आणि भारत यांच्यातील टेस्ट सिरिजचं नाव तेंडुलकर-कुक ठेवलं जावं”
- ऑरिक सिटीचा ७५०० हजार एकर जमिनीचा प्रकल्प सज्ज; आताउद्योगाची प्रतीक्षा


