Share

 ‘विश्वास ठेवा! शासनाकडून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी मदत देणार – विजय वडेट्टीवार

Published On: 

लातूर :- लातूर जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसात अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावून घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले आहेत.तरी शेतकऱ्यांनी धीर धरावा, राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या काळात झालेल्या नुकसानीची दिलासादायक मदत मिळेल, अशी ग्वाही मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन व इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

निलंगा येथे शासकीय विश्रामगृहात आयोजित अतिवृष्टीने झालेल्या पीक नुकसानीच्या अनुषंगाने आढावा बैठकीत मदत व पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार बोलत होते. यावेळी आमदार धिरज देशमुख, अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार गणेश जाधव त्यांच्यासह सर्व तालुकास्तरीय यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.

मदत व पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार पुढे म्हणाले की या आपत्तीच्या काळात सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून शासनाकडून त्यांना आवश्यक ती सर्व मदत दिली जाणारच आहे. तसेच राज्य शासनाने तीन दिवसापूर्वी केंद्र शासनाला राज्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष पाठवण्याची व एनडीआरएफच्या निकषानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची मागणी केलेली आहे असे त्यांनी सांगितले.

लातूर जिल्ह्यात खरिपाचे 6 लाख 65 हजार हेक्ट्र क्षेत्र असून सप्टेंबर मध्ये पहिल्या आठवड्यात झालेला सततचा पाऊस व मागील तीन-चार दिवसातील अतिवृष्टी यामुळे जवळपास दोन लाख हेक्टार क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. जिल्हा प्रशासनाने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व शेतीपिकांचे अत्यंत सूक्ष्मपणे पंचनामे पुढील तीन दिवसात करून शासनाला अहवाल सादर करावा, असे निर्देश मदत व पुनर्वसनमंत्री वडेट्टीवार यांनी दिले.

नळगीर तालुका उदगीर, जळकोट या भागातील शेती पिकाची पाहणी मदत व पुनर्वसन मंत्री श्री वडेट्टीवार यांनी केली तर निलंगा तालुक्यातील सोनखेड या गावातील पीक नुकसानीची पाहणी करून येथे उपस्थित शेतकऱ्यांना धीर दिला व शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी आमदार धीरज देशमुख निलंगा विधानसभेचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर हे ही उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!