Share

पंजाबच्या विजयांनंतर ‘प्रीती झिंटा’ भलतीच ट्रोल 

Published On: 

मुंबई : यंदाच्या आयपीएल मध्ये महत्वाच्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबने सलग ६ सामने गमावले असून, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सोबत झालेल्या सामन्यात अखेर विजय मिळवला होता. त्यांनतर मुंबई सोबत काल झालेल्या सामन्या दरम्यान  मुबई इंडियन्स कडून पंजाबचा पराभव निश्चित होता. परंतु मुबंई इंडियन्स विरुद्ध पंजाब सामन्यात सुपर ओव्हर झाली या सुपर ओव्हरमध्ये पंजाबनं बाजी मारली.

या सामन्या दरम्यान अभिनेत्री प्रिती झिंटा देखील स्टेडियमध्ये उपस्थित होती. या विजयानंतर प्रीती आश्चर्यचकित झाली होती. सामना जिंकल्यानांतर प्रीती भलतीच खुश झाली. याचवरुन प्रीतीला सोशल मीडियावर क्रिकेट चाहत्यांनी कमालीची ट्रोल केली.  एका नेटकाऱ्याने   ट्विट करत म्हणत आहे की, ‘ज्या लोकांनी आजचा ऐतिहासीक रंजक सामना पाहिला नाही त्यांच्यासाठी २ मिनिटांचा मौन.. ‘ पंजाब हा सामना जिंकल्यानंतर ट्विटर वरती बरेच मेम्स बनवले गेले. पंजाब सामना जिंकल्यावर प्रीतीला सोशल मीडियावरून नेटकऱ्यांनी सुभेच्छा देखील दिल्या.

दरम्यान रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध पंजाबच्या विजयानंतर बॉलिवूड अभिनेता सलमान खान याचं २०१४ चे ट्विट व्हायरल झाले होते. त्यात त्यानं, झिंटा टीम जिंकली का?. असा प्रश्न विचारला होता. सलमान खानचे हे ट्विटदेखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. सलमानच्या या ट्विटचे बरेच मेम्स देखील बनवले जात होते.

या विजयाबरोबर पंजाबनं थेट सहाव्या स्थानी झेप घेतली असून प्ले ऑफच्या शर्यतीतील दावेदारीची आस कायम राखली आहे. मुंबईनं १२ गुणांसह दुसरे स्थान कायम राखले आहे.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!