मुंबई : राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. राज्यात शनिवारी ४९ हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्याने राज्याची स्थिती गंभीर होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली आहे.
राज्यात शनिवारी व रविवारी संपूर्ण लॉकडाऊन म्हणजेच वीकेंड लॉकडाऊन करण्यात आला असून सोमवारी रात्री आठ वाजल्यापासून कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. राज्यात कोरोनाचा धोका वाढला असला तरी पंढरपूर मध्ये मात्र पोटनिवडणुकीच्या प्रचारसभांचा धुरळा उडाला आहे. राज्यात दिवसभर जमावबंदीसह रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी लागू करण्यात आल्याने पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या निवडणुकीचे काय होणार ? असा सवाल निर्माण झाला आहे.
याबाबत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं असून निवडणूक ठरल्याप्रमाणे होतील असं ते म्हणाले आहेत. ‘राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकांना यातून सूट देण्यात आली आहे. कारण ही निवडणूक भारत सरकारने लावलेली आहे. तर, सहकारासह राज्य सरकारच्या अखत्यारीत ज्या निवडणूक येतात त्या पुढे ढकलण्याची चर्चा देखील झाली आहे,’ अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.
पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक कधी ?
पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं २८ नोव्हेंबर रोजी निधन झालं. भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी १७ एप्रिलला मतदान होणार असून २ मे रोजी मतमोजणी होणार आहे. राष्ट्रवादीकडून दिवंगत भारत नाना भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. तर, भाजपने भगीरथ भालके यांच्या विरोधात समाधान आवताडे मैदानात उतरवलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : राज्यात वीकेंड लॉकडाऊन; तर कडक निर्बंध लागू होणार
- मुख्यमंत्रीसाहेब, जनतेच सोडा आधी मंत्र्यांना आवर घाला; जयंत पाटलांच्या दौऱ्यात नियमांना तिलांजली
- ‘उद्धवसाहेब तुम्ही लोकांचा जीव वाचवण्याला प्राधान्य द्या उद्योग जगत तुमच्या पाठीशी आहे’
- निःशब्द भावनांना बच्चू कडू यांची साथ, राख झालेल्या संसाराला दिला मदतीचा हात
- पुण्यानंतर राज्यात ‘मिनी लॉकडाऊन’ ‘हे’ असणार कडक निर्बंध !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

