लातूर : कोरोनाचा धोका कमी झाला असला तरी अद्याप संपलेला नाही. त्यामुळे प्रशासनाच्या पातळीवर काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यातच तिसरी लाट येण्याची भीतीही व्यक्त होत आहे. त्यासाठी सरकारच्या वतीने प्रशासनाला तयारी करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. तशी तयारी देखील सुरू करण्यात आली आहे. मात्र, नागरिकांनी दक्षता घेतली तर तिसऱ्या लाटेची वेळच येणार नसल्याचे आमदार धीरज देशमुख यांनी म्हटले आहे. रेणापूर तालुक्यातील सुमठाण इथल्या विकास कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले.
रेणापूर तालुक्यातील सुमठाणा येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लॅाक रस्त्याचे भूमिपूजन धीरज देशमुख यांच्या हस्ते झाले. या वेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. ते म्हणाले की, ‘कोरोनाची संभाव्य तिसरी लाट पसरणार नाही, याची खबरदारी प्रत्येकाने घ्यावी. लसीकरण करून घेण्याबरोबरच स्वतःची आणि कुटुंबियांची आरोग्यविषयक काळजी घ्यावी. संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सरकार आणि प्रशासन योग्यती व्यवस्था उभी करत आहे. पण, या व्यवस्थेचा वापर होणार नाही, इतकी स्वतःची दक्षता आपण प्रत्येकाने घ्यावी.’
संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सरकार आणि प्रशासन योग्यती व्यवस्था उभी करत आहे.पण,या व्यवस्थेचा वापर होणार नाही,इतकी स्वतःची दक्षता आपण प्रत्येकाने घ्यावी,असे आवाहन केले#लातूर_ग्रामीण@CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @bb_thorat @AmitV_Deshmukh @HKPatil1953 @NANA_PATOLE
— Dhiraj V Deshmukh (@MeDeshmukh) June 30, 2021
राज्यातील कोरोना रुग्ण संख्या कमी झाली आहे. मात्र, काही तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांनी काळजी घेतली तर कोरोनाची तिसरी लाट आपण थांबवू शकतो. असेही मत या वेळी आमदार देशमुख यांनी व्यक्त केले.
महत्त्वाच्या बातम्या
- स्मार्टफोन, टीव्ही, कार आणि फ्रिज ‘या’ कारणामुळे होणार महाग
- आता चित्रा वाघ यांच्या खांद्यावर चंद्रकांतदादांनी सोपवली ‘विशेष’ जबाबदारी !
- मोठी बातमी : अजित पवार, अनिल परब यांच्या सीबीआय चौकशीसाठी भाजपचं थेट अमित शाहांना पत्र
- पवार-ठाकरे भेटीत नेमकी काय चर्चा झाली ?
- उद्धवजी… जबाबदारी एकमेकांवर ढकलून लसीकरण मोहीम यशस्वी होईल का ?


