Share

मोठी बातमी : अजित पवार, अनिल परब यांच्या सीबीआय चौकशीसाठी भाजपचं थेट अमित शाहांना पत्र

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : माजी आयुक्त परमबीर सिंह आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या लेटरबॉम्बनंतर राज्यात राजकीय खळबळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे. सचिन वाझे यांच्या पत्राच्या आधारे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अनिल परब यांच्याविरोधात सीबीआय चौकशीची मागणी करण्याचा ठराव भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत घेण्यात आला होता.

हा ठराव भाजपने मंजूर केल्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी भाजपवर हल्लाबोल केला होता. आता भाजपने पुढचं पाऊल टाकलं असून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार आणि अनिल परब यांच्या सीबीआय चौकशीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना निवदेन पाठवलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहनमंत्री अनिल परब यांच्याविरोधात सचिन वाझे याच्या पत्रात वसुलीचे गंभीर आरोप आहेत. त्यामुळे त्यांची सीबीआयतर्फे सखोल चौकशी करा, असं चंद्रकांत पाटील यांनी निवेदनात म्हटलं आहे. प्रदेश भाजपच्या एक कोटी दहा लाख सदस्यांतर्फे आपण ही मागणी करत असल्याचं देखील पाटील यांनी या निवदेनात नमूद केलंय. त्यामुळे अनिल देशमुख यांच्यानंतर अजित पवारांसह परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता बळावली असून अमित शाह काय निर्णय घेणार हे महत्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!