Share

स्मार्टफोन, टीव्ही, कार आणि फ्रिज ‘या’ कारणामुळे होणार महाग

Published On: 

मुंबई : देशभरात कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी अनेक राज्यांनी लॉकडाऊन, कडक निर्बंध असे उपाय योजिले आहेत. तसेच या काळात अनेक व्यवहार बंद असल्याने अनेकांना संकटाचा सामना करावा लागला. अशा परिस्थितीत महागाई देखील वाढली आहे. यामुळे सामान्य माणसाची पिळवणूक होत आहे. यातच आता आणखी भर म्हणून इलेक्ट्रॉनिक वस्तू, स्मार्टफोनच्या किंमतीत देखील वाढ होणार आहे.

दरम्यान कोरोनाच्या या काळात सर्वच क्षेत्र बंद पडत असतना खासगी कंपन्यांकडून घरातून काम (वर्क फ्रॉम होम) असा मार्ग काढण्यात आला. तर आता मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाइन शिक्षणाचे धोरण स्वीकारण्यात आले आहे. असे असताना स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ झाल्यास सामन्य माणसाची अधिक चिंता वाढू शकते.

बाजारात कच्च्या मालाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. ज्यामुळे नियमित वापरल्या जाणाऱ्या वस्तूंच्या किंमतीत वाढ होत आहे. स्टील, अ‍ॅल्युमिनियम, रबर, तांबे, प्लास्टिक आणि इतर कच्च्या मालाच्या किंमती वाढल्या आहेत. मोठ्या एफएमसीजी कंपन्यांचे म्हणणे आहे की जर वस्तू, पॅकेजिंग आणि लॉजिस्टिकचा खर्च जास्त करावा लागला तर त्याचा थेट परिणाम रोजच्या जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीवर होईल.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर काही महिन्यांनंतर बाजार जूनमध्ये पुन्हा सुरु झाला. परंतु जर वस्तूंची किंमत वाढली आणि त्यांचे दर आणखी वाढेल, ज्याचा थेट मागणीवर परिणाम होईल. यामुळे विक्री कमी होईल, ज्यामुळे कंपन्यांना तोटा सहन करावा लागू शकतो. गेल्या सहा महिन्यांत बर्‍याच कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनांच्या किंमतीत ३ ते ५ टक्क्यांनी वाढ केली आहे.

सध्या सर्वसामान्य माणूस या महागाईच्या आगीत होरपळून निघत आहे. पेट्रोल डिझेलच्या किंमती समजून घेतल्या पण आता अत्यावश्यक अशा गॅस व खाद्यतेलाच्याही किंमती वाढत असल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे. अशातच आता स्मार्टफोन, टीव्ही, कार आणि फ्रिज देखील महाग झाल्यास अधिक चिंता वाढणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!