🕒 1 min read
मुंबई: कोकणातील गणेशोत्सव संपूर्ण राज्यात प्रचलित मानला जातो. मात्र यंदा कोरोनामुळे रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सामूहिक आरती, भजन, कीर्तन आणि महासंस्कृती भूषण असलेल्या जाखडी (बाल्या) नृत्याला बंदी घातली आहे. कोरोनामुळे गर्दी करणारे कार्यक्रम आयोजित करू नये असा आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे यंदा आरतीशिवायच कोकणात गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. दरम्यान यावरूनच भाजपचे अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाना साधला आहे.
‘राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे कोकणात यंदा आरतीविना गणेशोत्सव साजरा होणार आहे. ज्या निर्बंधांची लाज वाटली पाहिजे त्याचा या सरकारला गौरव वाटतोय. फक्त हिंदू सणांचे वावडे असणाऱ्या वसूली सरकारचा अतुल भातखळकर यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे.’ याबाबत त्यांनी ट्वीट करत टीका केली आहे.
राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे
कोकणात यंदा आरतीविना गणेशोत्सव साजरा होणार. ज्या निर्बंधांची लाज वाटली पाहिजे त्याचा या सरकारला गौरव वाटतोय.
फक्त हिंदू सणांचे वावडे असणाऱ्या वसूली सरकारचा तीव्र निषेध. pic.twitter.com/W1sQ9iUOXt— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 3, 2021
कोरोनामुळे जिल्ह्यात सार्वजनिक गणपती बसवू नये. बसवला तरी तो केवळ दीड दिवसांचा असावा. आरती, भजन, कीर्तन, जाखडी नृत्यांसाठी गर्दी करता कामा नये. गणपती दर्शनासाठी नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या घरी जाऊ नये. गणेश विसर्जन घरी राहून घरातच करावे. घरी शक्य नसल्यास हौद-कृत्रिम तलावात विसर्जन करावे, आगमन किंवा विसर्जन मिरवणूका काढू नयेत, अशा लेखी सूचना जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दिल्या आहेत. यावरूनच भाजपकडून ठाकरे सरकारवर टीका केली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ज्या शहरात चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील असतील तिथे ‘अशांतता’ कशी असेल?’
- मराठा आरक्षणातील अडसर दूर होणार ? संभाजीराजेंनी राष्ट्रपतींकडे केल्या ‘या’ २ महत्वाच्या मागण्या
- ‘आपलेच नगरसेवक घेऊन जात फोडले म्हणून सांगून स्वतःच्या पक्षप्रमुखाला वेडं बनवायचं म्हणजे…’
- ‘…म्हणजे सीबीआयचा तो अहवाल खरा आहे’; नवाब मलिक यांचा गौप्यस्फोट
- पुण्यातील धक्कादायक घटना ! जातपंचायतीऐवजी न्यायालयात घटस्फोटाचा दावा दाखल केला म्हणून…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
