टीम महाराष्ट्र देशा : सध्या राज्य दुष्काळात होरपळत आहे. बळीराजा चिंतेत आहे. त्यामुळे राज्यात दुष्काळग्रस्त भागात पुन्हा एकदा क्लाऊड सीडिंगचा (कृत्रिम पाऊस) प्रयोग करण्याच्या सरकारच्या हालचाली सुरु केल्या आहेत. लांबलेला पावसाचा अंदाज आणि धरणातील पाणीसाठ्यात होणारी घट पाहता सरकारच्या दुष्काळी भागात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी सरकारची तयारी केली आहे.
क्लाऊड सीडिंगच्या तरतुदीसाठी मदत व पुनर्वसन विभागाचा वित्त विभागाला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. यंदा क्लाऊड सीडिंगच्या ओरयोगासाठी ३० कोटींची तरतूद प्रस्तावित आहे. वित्त विभागाच्या तरतुदीनंतर राज्य मंत्रिमंडळाच्या मंजुरीने टेंडर्स मागवले जाणार आहेत.
यापूर्वी सरकारने प्रथमच २०१५ साली ऑगस्ट ते नोव्हेंबर महिन्यात मराठवाड्यात एकूण ४७ फ्लाईट्सच्या सहाय्याने मराठवाड्यात क्लाऊड सीडिंगचा प्रयोग केला होता. या प्रयोगासाठी सरकारने २७ कोटी खर्चून एकूण १३०० मिमी पावसाची नोंद केली होती.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

