मैसूर : कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोंमई यांनी सोलापूर, सांगली आमच्याकडे घेऊ, असे वादग्रस्त वक्तव्य करत नव्या वादाला आमंत्रण दिले होते. हा वाद शांत होण्याअगोदरच आता कर्नाटकच्या कृषी मंत्र्यांनी नव्याने वादग्रस्त वक्तव्य केले आहे. नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत आंदोलन सुरू आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या टोकाच्या निर्णयाचा मुद्दाही सातत्यानं चर्चेत येतं आहे.
यासंदर्भात बोलताना कर्नाटकातील कृषिमंत्री बी.सी. पाटील म्हणाले की, ‘जे शेतकरी स्वतःच आयुष्य संपवतात, ते मनाने कुमकुवत असतात. त्यासाठी सरकारला दोष देता येणार नाही.’ पाटील हे मैसूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. शेतकऱ्यांच्या समस्यांवर बोलताना त्यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे. एकीकडे शेतकरी थंडी, पाऊस, उन सर्व सहन करून कृषी कायद्यांविरोधात एकवटला असताना एका राज्याच्या कृषिमंत्र्याने असं वक्तव्य करणं हे निंदनीय असल्याचं म्हणत विरोधकांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
‘शेतकऱ्याकडून घेतल्या जाणाऱ्या या टोकाच्या निर्णयाला सरकारची धोरणं कारणीभूत नाहीत. फक्त शेतकरीच नाही, तर उद्योजकही जीवन संपवतात.’ असे पाटील म्हणाले. काही दिवसांपूर्वीच पाटील यांनी शेतकऱ्यांविषयी असंच एक विधान केलं होतं. ‘जे शेतकरी त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींचा विचार न करता, आपलं आयुष्य संपवतात, ते घाबरट असतात. जीव देणारे शेतकरी भेकड असतात. पत्नी आणि मुलांचा सांभाळ करू न शकणारे भेकड असतात. तेच जीवन संपवतात. जर आपण पाण्यात पडलो आहोत, तर आपल्या पोहायला आणि जिंकणं शिकायला हवं’ असं विधान पाटील यांनी केलं होतं.
महत्वाच्या बातम्या
- ‘शरद पवारांचा शेतकरी आंदोलनातील सहभाग म्हणजे निव्वळ ढोंगीपणा !’
- कोणीतरी पुड्या सोडतंय भाजपा सोडून कोणीही जाणार नाही – फडणवीस
- उद्धव ठाकरेंनी अर्थव्यवस्था समजावून सांगावी; राणेंचं थेट आव्हान
- ‘मी सुद्धा हिंदू आहे…’ तांडवच्या वादात उडी घेतल्यानंतर स्वरा भास्कर ट्रोल !
- ‘शिवसेनाप्रमुखांचे नाव कशा कशाला व किती ठिकाणी द्यायचे, याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

