मुंबई : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री व भाजप नेते नारायण राणे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपचाच झेंडा फडकेल. भाजपनं ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये घवघवीत यश संपादीत केलं त्याबद्दल मी जनतेचे आभार व्यक्त करतो.महाविकास आघाडीवरचा लोकांचा विश्वास हळूहळू उडत चालला आहे. लोकांना आता तीन पक्षांची भांडण कळायला लागली आहेत. या सरकारच्या काळात भ्रष्टाचारही वाढू लागला आहे. असे म्हणत महाविकास आघाडीवर त्यांनी टीकास्त्र डागले आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप हा एक नंबरचा पक्ष राहिला आहे. या निवडणुकांमध्ये भाजप विरुध्द तीन अशी लढाई झाली. तरीही भाजप सरस ठरला आहे असे म्हणत जनतेने भाजपला पसंती दिल्याचे स्पष्ट केले आहे. राणेंनी नेहमीप्रमाणेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला आहे.
उद्धव ठाकरे यांनी सरकारचं स्टेअरिंग आपल्याच हातात असल्याचा दावा केला होता. यावरून नारायण राणे यांनी जोरदार फटकेबाजी केली. उद्धव ठाकरेंनी समजावून सांगावं राज्यातल्या तिजोरीत किती पैसे आहेत, राज्याची अर्थव्यवस्था काय आहे, असं म्हणत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना खुलं आव्हानच दिलं आहे. तर, चिपी विमानतळाच्या उदघाटनावर देखील त्यांनी भाष्य करत शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- पुणे भाजपमध्ये मोठ्या बंडाळीची शक्यता, १९ नगरसेवक पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीत ?
- अशोक चव्हाणांनी मराठा समाजाची फसवणूक केली; विनायक मेटेंचा घणाघात!
- गावचा विकास करण्यासाठी आम्ही नेहमीच सोबत राहू; निलेश राणे यांनी केले विजयी उमेदवारांचे कौतुक
- पुणे भाजपमध्ये मोठ्या बंडाळीची शक्यता ? गिरीश बापट म्हणतात…
- ‘शिवसेनाप्रमुखांचे नाव कशा कशाला व किती ठिकाणी द्यायचे, याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
