Share

पाकिस्तानचा ‘हा’ स्टार खेळाडू म्हणतोय! भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंना खेळायचय एकमेकांविरुद्ध क्रिकेट

Published On: 

मुंबई : बऱ्याच कालावधीपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये विश्वचषक आणि इतर आयसीसीच्या स्पर्धेशिवाय कोणतेही क्रिकेट सामने खेळवले जात नाहीत. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानने भाष्य केले आहे. रिझवान म्हणतो की, ‘भारत आणि पाकिस्तानचे क्रिकेटपटू (भारत विरुद्ध पाकिस्तान द्विपक्षीय मालिका) एकमेकांविरुद्ध द्विपक्षीय क्रिकेट खेळू इच्छितात परंतु दोन्ही देशांच्या राजकीय बाबी खेळाडूंच्या नियंत्रणात नाहीत.’ भारत आणि पाकिस्तानचे क्रिकेट संघ जानेवारी २०१३ मध्ये द्विपक्षीय मालिकेत शेवटचे आमनेसामने भेटले होते. तेव्हा पाकिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. २००७-०८ च्या मोसमापासून दोन्ही संघ कसोटीमधील द्विपक्षीय मालिकेत आमनेसामने आलेले नाहीत. यादरम्यान दोन्ही संघांमध्ये द्विपक्षीय मालिका खेळवण्याची पाकिस्तानकडून वेळोवेळी मागणी होत असली, तरी भारताने प्रत्येक वेळी नकार दिला आहे.

दरम्यान, विश्वचषक आणि आशिया चषक स्पर्धांचा समावेश असलेल्या आयसीसी स्पर्धांमध्ये दोन्ही संघ एकमेकांसमोर खेळतात. पाकिस्तान संघ सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध मर्यादित षटकांची मायदेशात मालिका खेळण्याच्या तयारीत आहे. विंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना मोहम्मद रिझवान म्हणाला, “पाकिस्तान आणि भारताच्या क्रिकेटपटूंना एकमेकांविरुद्ध खेळायचे आहे, परंतु दोन्ही देशांच्या राजकीय बाबी खेळाडूंच्या नियंत्रणात नाहीत.”

पुजारा आणि रिझवान काउंटी क्रिकेटमध्ये ससेक्सकडून खेळले

मोहम्मद रिझवान आणि भारतीय कसोटी संघातील फलंदाज चेतेश्वर पुजारा नुकतेच इंग्लंडमध्ये काउंटी चॅम्पियनशिप खेळून परतले आहेत. दोघेही काउंटी चॅम्पियनशिपमध्ये एकाच संघाचा भाग होते. यादरम्यान दोघांनी एकमेकांसोबत बराच वेळ घालवला आणि एकमेकांच्या खेळाविषयी चर्चा केली. रिझवान आता पुजाराचे कौतुक करताना थकत नाही. रिझवान म्हणतो की, ‘पुजाराचे या क्रिकेट खेळाप्रती असलेले समर्पण आश्चर्यकारक आहे.’

चेतेश्वर पुजाराकडून मी खूप काही शिकलो

पुजाराने काउंटीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली होता. त्यानंतर त्याचे भारतीय कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. ससेक्सच्या एका सामन्यात पुजारा आणि रिझवाननेही महत्त्वाची भागीदारी केली होती. रिझवानच्या म्हणण्यानुसार, ‘माझी अनेकवेळा पुजारासोबत क्रिकेटविषयी चर्चा झाली आणि मी त्याच्याकडून खूप काही शिकलो. खेळाडू म्हणून आम्ही कधीच वेगळे नव्हतो. आम्ही एकाच क्रिकेट कुटुंबातील आहोत. तो एक अतिशय प्रतिभावान खेळाडू आहे. खेळावरील त्याचे लक्ष आणि समर्पण पाहून मी खरोखर प्रभावित झालो आहे.’ पाकिस्तानचा संघ ८ जूनपासून मुल्तान येथे वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!