मुंबई : गायक सिद्धू मुसेवाला याची भरदिवसा निर्घृण हत्या करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यावेळी 30 राऊंड गोळीबार करण्यात आला. या हत्येप्रकरणी आता दिल्ली आणि पंजाब पोलिसांनी छापेमारी सुरु केली आहे. माहितीनुसार दिल्ली पोलिसांची टीम नेपाळ या ठिकाणी पोहचली आहे. मुसेवाला यांच्या हत्येनंतर गुन्हेगार नेपाळमध्ये लपलेले असावेत असा संशय पोलिसांना केला आहे. नेपाळमध्ये गुन्हेगारांचा शोध सुरु आहे.
सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर जे व्हिडीओ समोर आले आहेत त्या व्हिडीओच्या माध्यमातून पोलिसांनी शोध सुरु केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून गुन्हेगारापर्यंत पोहचू शकतो असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मुसेवाला यांच्या हत्येनंतर अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. त्यानंतर आता एक नवीन व्हिडीओ समोर येत आहे. व्हिडीओमध्ये एका अरुंद रस्त्यावरून एक गाडी जाताना दिसत आहे. ही तीच गाडी आहे जी सिद्धू मुसेवाला स्वतः चालवत होते.
सिद्धू यांची गाडी रस्त्यावरून गेल्यानंतर दुसरी गाडी त्याच रस्त्यावरून शांतपणे निघून जाताना दिसते. गुन्हेगार बोलेरो गाडीमध्ये असावेत असता अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या हत्येसंदर्भात कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. पण पोलीस गुन्हेगारांना शोधून काढण्याचे खूप प्रयत्न करत आहेत.
दरम्यान, लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य असलेल्या लकीने या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. या हत्येप्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. लॉरेन्स बिश्नोई हत्येसंदर्भात त्याची भूमिका नकारत आहे पण अनेक खुलासे करत आहे.
महत्वाच्या बातम्या :

