Share

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी शासन कटीबध्द- पालकमंत्री देशमुख

Published On: 

लातूर : जिल्ह्यात मागील तीन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी शासन कटीबध्द असल्याचा विश्वास राज्याचे लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केला आहे. निलंगा तालुक्यातील गौर येथे मांजरा नदीच्या पुरामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पीकाचे नुकसान पाहणी वेळी ते बोलत होते.

पालकमंत्री म्हणाले की, ‘जिल्ह्यात अतिवृष्टी व मांजरा नदीच्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या पीकाचे मोठे नुकसान झाले असून प्रशासनाने त्यांचे तात्काळ पंचनामे करुन अहवाल शासनास सादर करावा असे निर्देश संबंधितांना दिले आहेत. तसेच शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास शासन कटीबध्द आहे.’

पीक विमा संदर्भातील ऑनलाईन/ऑफ लाईन पध्दतीने गाव पातळीवर अर्ज स्वीकारावे अशा सुचना यावेळी त्यांनी प्रशासनास दिल्या. पालकमंत्री देशमुख यांनी निलंगा तालुक्यातील गौर, मसलगा व ढोबळेवाडी येथील शेतकऱ्यांच्या शेतात जावून पीक नुकसानीची पाहणी करुन गावातील शेतकरी ग्रामस्थांशी आस्थेवाईकपणे चर्चा केली. त्यांच्या सूचना व मागण्याचे तात्काळ निराकरण करण्यात येईल असे स्पष्ट केले. यावेळी संबंधीत विभागाचे अधिकारी, कृषी सहायक, ग्रामसेवक, तलाठी, ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!