पुणे : मराठवाड्यामध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गुलाब चक्रीवादळाचा परिणाम म्हणून या भागामध्ये तुफान पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले पीक वाहून गेले आहे. त्यामुळे आता पुढे काय? असा यक्षप्रश्न शेतकऱ्यांच्या समोर उभा राहिला आहे.
याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नुकसानीच्या पाहणीसाठी करण्यासाठी मराठवाड्याचा दौरा करणार असल्याची माहिती काल राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली होती. तर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर हे देखील आता मराठवाडा व विदर्भाचा दौरा करणार आहेत. याबाबतची माहिती प्रवीण दरेकर यांनी आज पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे.
तसेच यावेळी दरेकर म्हणाले की, ‘मुख्यमंत्री म्हणतात पंचनामे करा व सरकारमधले मंत्री म्हणतात पंचनामे न करता मदत करा. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी नेमकं काय करणार आहात हे सांगा. आमची मागणी आहे की तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा त्याचबरोबर पंचनामे करायचे तेव्हा करा पण आता तात्कालीक मदत शेतकऱ्यांना देण्याची आवश्यकता आहे. कारण वराती मागून घोडे नाचवून काहीच उपयोग नाही.’ असे स्पष्ट मत यावेळी दरेकर यांनी मांडले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आम्हाला कोणत्याही युतीची गरज नाही, आमची पक्षबांधणी उत्तम; संजय राऊत कडाडले
- महात्मा गांधींचे विचार सामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी भाजपा तर्फे राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन
- भारतीय लष्कराच्या गौरवशाली आणि अभिनास्पद कामगिरीचे दर्शन घडवणारे मुंबईत उभे राहणार लष्करी संग्रहालय
- ‘माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग देश सोडून फरार?’, अजित पवारांनी दिले उत्तर
- ‘मुख्यमंत्री किती मिनिटांचा मराठवाडा दौरा करतात हे पाहावे लागेल’, मनसेचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

