Share

कोरोना लसीच्या लहान मुलांवरील क्लिनीकल ट्रायलला पुण्यात सुरुवात

Published On: 

पुणे : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. आता ही लाट ओसरल्याचे दिसत असले तरी कोरोना विषाणूचे नवीन प्रकार हे अधिक घटक असल्याचं देखील समोर येत आहे. देशात 18 वर्षांच्या वरील सर्वांना लसीकरण सुरु आहे. मात्र १८ वर्षाखालील मुलांसाठी अद्याप लस दिली जात नव्हती. आता ५ ते १८ वर्षाच्या मुलांसाठी दिलासादायक बातमी आहे.

सिरमच्या कोव्हाव्हॅक्स लसीच्या लहान मुलांवरील क्लिनीकल ट्रायलला सुरुवात झाली असून भारतात 9 ठिकाणी 1 हजार मुलांवर ही चाचणी करण्यात येणार आहे. पुण्यात तर या चाचणीला सुरुवता देखील झाली आहे. बुधवारी 9 मुलांना लस देण्यात आली आहे. सिरम इन्स्टिट्यूटमार्फत 18 वर्षाखालील मुलांसाठी लस निर्मिती करण्यात आली असून त्याची क्लिनिकल ट्रायल सुरु झाली आहे.

पुणे जिल्ह्यातील भारती हॉस्पिटलमध्ये 100 मुलांवर ही क्लिनिकल चाचणी केली जाणार आहे. यामध्ये 2 ते 18 वयोगटातील मुलांना ही लस दिली जाईल. विशेष म्हणजे चाचणी पूर्ण झाल्यानंतर या लसीचे परिणाम जर सकारात्मक आले तर पुढील वर्षी जानेवारी महिन्यात लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. तशी माहिती भारती हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. संजय ललवाणी यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!