मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांना ईडी, एनआयए, सीबीआय चौकशीची मेसेजद्वारे धमकी देण्यात आली आहे. एका अज्ञात व्यक्तीकडून व्हॉट्सअपवर धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
या अज्ञात व्यक्तीने मिलिंद नार्वेकर यांच्याकडे काही मागण्या केल्या असून त्या पूर्ण न केल्यास त्यांच्या मागे ईडी, एनआयए आणि सीबीआयची चौकशी करायला लावू अशी धमकी दिली आहे. दरम्यान, नार्वेकर यांच्याकडे नेमक्या कोणत्या मागण्या करण्यात आल्या आहेत याची माहिती उपलब्ध झालेली नाही. मात्र, या अज्ञात व्यक्तीने केलेल्या मागण्या नार्वेकर यांनी पूर्ण न केल्यास मिलिंद नार्वेकर यांच्यामागे चौकशी लावण्याची धमकी दिली आहे. मिलिंद नार्वेकर यांनी या अज्ञात व्यक्तीविरोधात मुंबईच्या पोलिस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.
यावर आता भाजपचे नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केले आहे. ‘मिलिंद नार्वेकर स्वतःला वाघ म्हणतात. त्यांना धमकी त्यामुळं कायदा व सुव्यवस्थेचा विचार करावा लागणार आहे. गुंडांची इतकी हिम्मत की ते वाघाच्या गुहेत जाऊन नार्वेकरांना व्हाट्सअप करताहेत. त्यामुळं वाटत की कायदा व सुव्यवस्थेची भीतीच राहिली नाही. नार्वेकरांना धमकी देणं हे तर मलाही आश्चर्य वाटत. नार्वेकरांना धमकी देणाऱ्याच चरित्र मलाही जाणून घ्यायचंय. थेट वाघाच्या गुहेत जाऊन धमकी दिली, हा कोण आहे बाबा?’ असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘आता घरातही महिलांवर अन्याय होतोय, हे कधीपर्यंत सुरू राहणार?’, चित्रा वाघ यांचा सवाल
- अकरावीची प्रवेश प्रक्रिया झाली सुरु; वाचा कोणती फेरी कधी ?
- मान्सून पुन्हा सक्रिय ; राज्यातील ‘या’ भागात कोसळणार, येलो अलर्ट जारी
- ‘तुम्हाला दिल्लीतल्या दाढीवाल्याने आरोप करायला सांगितले का?’, नाना पटोलेंचा गडकरींना खोचक सवाल
- ‘राज्यावर सप्टेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येणार ; नियोजन करा’-अजित पवार
- ‘पुलवामासारखे हल्ले करणाऱ्या पाकिस्तानला मोदींनी भारतीयांची लस फुकट दिली’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

