कॅनबेरा : ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत या सामन्यात भारताने ३ विके्टसने विजय मिळवत इतिहास रचला. या विजयासह भारताने २-१ ही मालिका जिंकली आहे. भारताचा हा ऑस्ट्रेलियन भूमीतील सलग दुसरा मालिका विजय आहे. याचबरोबर गेल्या ३३ वर्षांचा ऑस्ट्रेलियाचा ब्रिस्बेन कसोटीत अपराजित राहण्याचा विक्रमही भारताने खंडीत केला.
घरच्या मैदानात ऑस्ट्रेलियाला पराभव स्वीकारावा लागला. यामुळे ऑस्ट्रेलिया संघावर आजी माजी खेळाडूंकडून सडकून टीका होत आहे. या पराभवामुळे टीम पेनचं कर्णधारपद धोक्यात आलं. यानंतर आता प्रशिक्षक जस्टिन लँगरचं पदही धोक्यात आलं आहे. खेळाडूंना लँगरच्या प्रशिक्षणाची पद्धत पटत नसल्याचं म्हटलं जात आहे.
ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना लँगरची प्रशिक्षणाची पद्धत पटत नसल्याचे वृत्त सिडनी मॉर्निंग हेरॉल्डने दिलं आहे. तसेच खेळाडूंनी लॅंगरकडून देण्यात येणाऱ्या वागणूकीबद्दलही नाराजी व्यक्त केली आहे. लँगर ऑस्ट्रेलियाच्या तिन्ही प्रकारात प्रशिक्षकापदाची भूमिका पार पाडत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, लँगर तिन्ही फॉर्मेटमध्ये प्रशिक्षक पदासाठी पात्र नसल्याचं म्हटलं आहे. मनमर्जी कारभारामुळे लँगरवर नाराज असल्याचं म्हटलं जात आहे.
या सर्व बाबतीत लँगरला प्रश्न विचारण्यात आले. यावेळेस लँगरने सर्व वृत्ताचं खंडण केलं. “खेळाडू आणि माझ्यात चांगले संबंध आहेत. माझ्यावर कोणत्याही प्रकारे दबाव नाही. प्रशिक्षक पद हे फार जबाबदारीचं पद आहे. ते मी जबाबदारीने पार पाडतोय”, असं लँगरने स्पष्ट केलं.
महत्वाच्या बातम्या
- खासदारांनी माहिती घेऊन चौकशीनिशी बोलावे-तनवाणी
- पालिका-वक्फ बोर्डाचा वाद चिघळण्याची शक्यता
- साष्टपिंपळगावमधील मराठा समाजाचे उपोषण मागे
- जय शाह यांची आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती
- “पंजाबच्या शेतकऱयांशी असे वागणे म्हणजे देशात अशांततेची नवी ठिणगी टाकणे”


