🕒 1 min read
इंग्लंड : डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाच्या पराभवामुळे कोट्यावधी भारतीय चाहत्यांची मने मोडली. या महान सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या विजयाबद्दल मोठे दावे केले जात होते. पण डब्ल्यूटीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्युझीलंडने भारताचा ८ गडी राखुन पराभव करत विजेतेपद पटकावले.
या सामन्यानंतर आता भारतीय संघाला ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात इंग्लंड संघासोबत पाच कसोटी सामन्याची मालिका खेळायची आहे. त्या आधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. या मालिकेपुर्वी भारतीय संघाचा सलामीवीर शुभमन गील जायबंदी झाला आहे. टीम इंडियाचा ओपनर शुभमन गिल दुखापतीमुळे खेळू शकणार नाही अशा सर्वत्र चर्चा रंगल्या होत्या.
पण त्याला कोणती दुखापत झाली हे समजले नव्हते, आता याबाबत माहिती मिळाली आहे. गिलच्या पायाला गंभीर दुखापतझाली असून त्याला किमान पुढील दोन महिने मैदानाबाहेर रहावे लागणार आहे. त्यामुळे तो इंग्लंडविरुद्धच्या किमान पहिल्या तीन कसोटी सामन्यांत खेळू शकणार नाही, हे निश्चित असल्याचे बीसीसीआयच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘महागाईचा आजार, जनता बेजार…सुखाने आहे फक्त मोदी सरकार’
- राजकीय गोटात खळबळ : आघाडीत बिघाडी ? शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये गुप्त बैठक
- पिंपरी-चिंचवडमध्ये आता पार्किंगसाठी मोजावे लागणार पैसे ! जाणून घ्या किती आहे रक्कम
- ‘राष्ट्रवादीच्या कार्यालयावरील दगडफेकीला योग्य उत्तर दिलं जाईल, भाजपसाठी ही धोक्याची घंटा’
- ‘शरद पवार कृषी तज्ज्ञ, कृषीमंत्री राहिले तरी शेतकरी समाधानी का नाहीत?’, निलेश राणेंचा प्रश्न
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
