Share

क्वारंटाईनमधून बाहेर येताच भारतीय खेळाडूंची पूल पार्टी ; फोटो होतोय व्हायरल

Published On: 

🕒 1 min read

श्रीलंका : शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय संघ सोमवारी श्रीलंकेत दाखल झाला. श्रीलंकेत टीम इंडिया तीन एकदिवसीय सामने आणि तब्बल टी -20 सामने खेळणार आहे. या दौर्‍याची सुरुवात वनडे मालिकेपासून होईल. पहिला एकदिवसीय सामना 13 जुलै रोजी, दुसरा 16 रोजी आणि तिसरा वनडे 18 रोजी खेळला जाईल. भारताचे प्रमुख खेळाडू सध्या इंग्लंडमध्ये असल्याने या दौऱ्यासाठी नवख्या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

भारतीय संघ श्रीलंकेत दाखल झाला असून २९ जून ते १ जुलै पर्यंतचा आपला क्वारंटाईन कालावधीत पूर्ण करून सर्व खेळाडू आता एकत्र आले आहेत. २ ते ४ जुलै या कालावधीत त्यांना सराव करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ५ जुलैपासून हा संघ एकत्र सराव करण्यास सुरुवात करतील, अशी माहिती श्रीलंका क्रिकेटच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे.

https://twitter.com/surya_14kumar/status/1410591426325336068?s=20

https://twitter.com/yuzi_chahal/status/1410576826494185475?s=20

दरम्यान, आपला क्वारंटाईन कालावधी पूर्ण करून हे खेळाडू एकत्र मजा मस्ती करताना दिसले बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटवर या खेळाडूंचा एकत्रित एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सर्व खेळाडू स्विमिंग पूलमध्ये एकत्र मजा मस्ती करताना दिसत आहेत. फोटो शेअर करत बीसीसीआयने लिहिले की, ‘क्वारंटाईन कालावधी पूर्ण करत खेळाडू एकत्र मजा करत आहेत.’ हाच फोटो युजवेंद्र चहल आणि सूर्यकुमार यादव यांनीही शेअर केला आहे. शेअर केलेला हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!