Share

रेमडेसिवीरचा काळाबाजार करणारी टोळी गजाआड

Published On: 

बदनापूर: कोरोनाच्या संख्या दिवसेंदिवस वाढत आहे रुग्णांना संजीवनी समल्या जाणाऱ्या रेमडेसिविर तसेच उपचारासाठी रेमडेसिविर इंजेक्शनची वाढती मागणी असल्यामुळे त्याचा काळाबाजार सुरू झाला आहे. औरंगाबाद आयुक्तालयातील पोलिसांनी रेमडेसिविरचा काळाबाजार करणारी एक टोळी गजाआड केली आहे. त्या टोळीतील चार जण बदनापूर येथील असल्यामुळे व इंजेक्शन जालना कोविड सेंटर येथील एका कर्मचाऱ्याने दिलेले असल्याचे सांगण्यात येत असल्यामुळे रेमडेसिविरच्या काळ्या बाजाराची साखळी बदनापूरमार्गे कोविड सेंटर जालनापर्यंत जाताना दिसत आहे.

औरंगाबाद येथील दिनेश नवगिरे व त्याचे साथीदार हे कोविड १९ उपचारासाठी लागणारे रेमडेसिविर इंजेक्शन स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी अधिकृत वैद्यकीय अधिकारी यांचे प्रिस्क्रिप्शन अथवा पावती नसताना अवैधरीत्या प्राप्त करून मूळ किमतीपेक्षा चढ्या भावाने औरंगाबाद शहरात विक्री करत असल्याबाबतची माहिती मिळाल्यावरून पोलिस प्रशासन व अन्न व औषध प्रशासन अधिकारी यांना माहिती देऊन गुन्हे शाखेचे अंमलदार विशाल पाटील यांना बनावट ग्राहक पाठवून दिनेश नवगिरे यांच्या मोबाइल क्रमांकावर रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी करून त्यांच्या फोन पे क्रमांकावर आगाऊ २० हजार रुपये पाठवून इंजेक्शनची मागणी केली.

नवगिरे याच्याकडे इंजेक्शन बाळगण्याचा परवाना किंवा प्रिस्क्रिप्शन आहे काय या बाबत विचारणा केली असता त्याने त्याच्याकडे कुठलाही परवाना नसल्याचे कळवले त्याला ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली असता त्याने सदरचे इंजेक्शन हे जालना कोविड सेंटर येथे काम करणारे कर्मचारी मित्र यांच्याकडून काळ्याबाजारात विकण्यासाठी आणल्याची कबुली दिल्याने दिनेश कान्हू नवगिरे त्याचे काही साथीदार आणि मुद्देमालासह जप्त केला आहे. औरंगाबाद येथे झालेल्या कारवाईतून बदनापूर येथील चार जणांना ताब्यात घेण्यात आल्यामुळे व काळाबाजार करणाऱ्याने इंजेक्शन जालना कोविड सेंटर येथे काम करणाऱ्या मित्राने दिलेले असल्याचे सांगितल्यामुळे याचे बदनापूर मार्गे जालना कनेक्शन असल्याचे दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!