मुंबई : भाजप महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी शिवसेनेचे नेते रघुनात कुचिक (Raghunath Kuchik) यांच्यावर गंभीर आरोप केले असून कुचिक यांनी एका तरुणीवर बलात्कार करुन तिला गर्भपात करायला लावला. त्यानंतरही कुचिक यांना जामीन देण्यात आला असून ते या तरुणीवर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणत आहे. तसेच फेसबुकवर या तरुणीने आपण स्वत:ला संपवत असल्याची पोस्ट केली असून ती मुलगी बेपत्ता आहे असा दावाही चित्रा वाघ यांनी केला आहे.
शिवसेनेचा पुण्याचा बलात्कारी नेता रघुनाथ कुचिक- अत्याचारीत तरूणीने FB वर पोस्ट करत कुठूनही न्याय मिळत नसल्याने आत्महत्या करते असं लिहीलयं..
पुणे पोलिसआयुक्त सहआयुक्त गृहमंत्री सगळ्यांना कळवलयं
तिच्या जिवाचं बरंवाईट झालं तर सर्वस्वी जबाबदार सरकार व पोलिस असतील
वाचवा त्या मुलीला… pic.twitter.com/6S014jT1UH— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) March 13, 2022
यासंदर्भात चित्रा वाघ यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये त्या म्हणाल्या आहेत की,‘हाचं तो हरामखोर बलात्कारी शिवसेना पुण्याचा नेता रघुनाथ कुचिक ज्याने एका मुलीवर बलात्कार केला व जबरदस्तीने गर्भपात ही करवला. न्याय मिळत नाही म्हणून आत्महत्या करतं स्वत:ला संपवते म्हणत तीने काल FB पोस्ट केली अजूनही त्या मुलीचा तपास लागत नाहीये..ती गायब आहे .’
2️⃣ कुठे गेलीये ती मुलगी कि यानेच तिला गायब केली याचा ही तपास करा
हीची पूजा चव्हाण होऊ देऊ नका मुख्यमंत्री महोदय
आत्महत्येला प्रवृत्त करणार्या कुचिकवर तात्काळ ३०७ चा गुन्हा दाखल करा..
तिच्या मरणाची वाट बघू नका त्याआधी वाचवा तीला @CMOMaharashtra @maharashtra_hmo @Dev_Fadnavis
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) March 14, 2022
दरम्यान, कुठे गेलीये ती मुलगी कि यानेच तिला गायब केली याचा ही तपास करा. हीची पूजा चव्हाण होऊ देऊ नका मुख्यमंत्री महोदय. आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या कुचिकवर तात्काळ ३०७ चा गुन्हा दाखल करा. तिच्या मरणाची वाट बघू नका त्याआधी वाचवा तीला, असे चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- फडणवीसांचा जबाब का घेतला याचे उत्तर दिलीप वळसे पाटलांनी दिले…
- “नाना पटोलेंना उर्जामंत्री करा, तेच…”; सोलापुरातील काँग्रेस नेत्यांची मागणी
- “इंदिरा गांधींनी माझ्या वडिलांना दोन वर्ष…”; देवेंद्र फडणवीसांचा मोठा खुलासा
- ‘तो धोनी सारखा कुल’ म्हणत इरफान पठाणने केली ‘या’ खेळाडूची प्रशंसा
- कोरोना नुकसान भरपाईच्या खोट्या दाव्यांवर सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

