Share

चालू कार्यक्रमात अक्षय कुमारने मारला परिणीती चोप्राला टोमणा; व्हिडिओ व्हायरल

Published On: 

मुंबई: लोकप्रिय रिऍलिटी शो हुनरबाजमध्ये विविध बॉलीवूड स्टार्स त्यांच्या आगामी चित्रपटांच्या प्रमोशनसाठी दर आठवड्याला येतात. यावेळी अक्षय कुमार त्याच्या ‘बच्चन पांडे’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या शोमध्ये आला होता. या शोमध्ये अक्षयसोबत क्रिती सेनॉनही आली होती. यादरम्यान शोमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अक्षय कुमार परिणीती चोप्राची मस्करी करताना दिसत आहे.

अक्षय कुमार कुठेही असला तरी त्याला संधी मिळेल तेव्हा तो त्याच्या सहकाऱ्यांची चेष्टा मस्करी करताना असतो. असाच काहीसा प्रकार या व्हिडिओतही पाहायला मिळतोय. व्हिडिओमध्ये परिणीती चोप्रा आणि करण जोहर एकत्र गाणे गाताना दिसत आहेत. गाणे ऐकल्यानंतर अक्षय कुमार एक भन्नाट प्रतिक्रिया दिली.

https://twitter.com/ColorsTV/status/1502244862372253697

व्हिडिओमध्ये परिणीती ‘कुछ कुछ होता है’ हे गाणं गट असते, ज्यामध्ये करण जोहरही गाण्याचे एक-दोन शब्द गातो. गाण्यानंतर करण परिणीतीच्या डोक्यावर हात ठेवतो आणि म्हणतो की या मुलीला जे काही शिकवले आहे त्याप्रमाणे तिने अप्रतिमपणे गाणे गायले आहे. हे पाहून अक्षय म्हणतो की परिणीती खर्च कमाल आहे, एकीकडे करण जोहरचा हात आहे, तर दुसरीकडे चोप्राजींचा हात एका आहे. यानंतर सगळे जोरजोरात हसायला लागतात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून त्यावर लोकांकडून विनोदी प्रतिक्रिया येत आहेत. अक्षयच्या आगामी ‘बच्चन पांडे’ या चित्रपटाबाबत बोलायचे झाले तर अक्षय बरोबरच यात क्रिती सेनॉन, अर्शद वारसी, पंकज त्रिपाठी, संजय मिश्रा, अभिमन्यू सिंग आणि जॅकलीन फर्नांडिस दिसणार आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!