मुंबई: मॅन ऑफ द मॅच म्हटलं की एक चित्र डोळ्यासमोर येते. हा पुरस्कार मिळालेल्या खेळाडूने काहीतरी मोठे केले असेल. त्यामुळे त्या खेळाडूला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला. पण क्रिकेट विश्वात असेही प्रसंग झालेत जेव्हा एखाद्या खेळाडूने फलंदाजी केली नाही आणि गोलंदाजी केली नाही, तरीही त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. हो असे घडले आहे.
खेळाडू नसतानाही एकदा ग्राउंडमनला मॅन ऑफ द मॅच म्हणून सन्मानित करण्यात आले होते. घडले असे की, डिसेंबर २००० मध्ये दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलँड यांच्यात वँडरर्स येथे तिसरी कसोटी खेळवण्यात येत होती. पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ थांबला. मात्र, ग्राउंड्समन ख्रिस स्कॉट (chris scott) आणि त्यांच्या समर्पित टीमने पाणी काढण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
ग्राउंड्समन ख्रिस स्कॉट आणि त्यांच्या समर्पित टीममुळे दुसऱ्या दिवशी खेळ शक्य झाला. त्याच्या या कार्याची दखल घेत सामना अधिकाऱ्यांनी ख्रिस स्कॉटला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार दिला. त्यामुळेच क्रिकेट सामना सुरळीत पार पाडण्यात ग्राऊंडसमनचा मोठा वाटा असल्याचे बोलले जाते.