🕒 1 min read
नवी दिल्ली : चित्रपट निर्माते अशोक पंडित अनेकदा कॉंग्रेसवर हल्लाबोल करताना पाहायला मिळाले होते. आता पुन्हा एकदा त्यांनी पुन्हा एकदा कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि कॉंग्रेस पक्षावर जोरदार टीका करताना दिसले आहेत. अशोक पंडित यांनी ट्वीट करून कॉंग्रेस पक्षावर आपला राग व्यक्त केला आहे.
नुकतेच त्यांनी एक नवं ट्विट केलं आणि या नव्या ट्विटमुळे ते पुन्हा चर्चेत आले आहे. ‘दहशतवादी संघटनांनीही इतकं नुकसान केलं नाही तितकं नुकसान गांधी परिवाराने केले’ अशा आशयाचे ट्विट त्यांनी केलं आहे. अशोक पंडित यांनी पुढे असे म्हटले की, ‘आपल्या फायद्यासाठी गांधी परिवाराने काश्मिरमधल्या दहशतवादाला खतपाणी घातल आहे. आणीबाणी लागू केली, नक्षलवादात वाढ झाली. दहशतवादी संघटनांनीही एवढं नुकसान केलं नाही जेवढं गांधी परिवाराने केलं आहे.’
https://twitter.com/ashokepandit/status/1412047554825441285?s=20
इतकंच नाही तर ते असेही म्हणाले की, ‘राहुल गांधी, तुमचा पक्ष गिलानींच्या उपचारासाठी दिल्लीमधील पंचतारांकित रुग्णालयावर कोट्यावधींचा खर्च करतो. गिलानी हे हजारो काश्मिरी हिंदूंच्या मृत्यूचं कारण ठरले आहेत. शत्रूंसोबत उभं राहणं हे तुमच्या रक्तातच आहे.’ अशा आशयाचे ट्वीट करून पंडित यांनी राहुल गांधींवर घणाघात केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- आसामच्या मुख्यमंत्र्यांनी एन्काऊंटर पॅटर्नचे समर्थन केल्याने वाद निर्माण का झाला आहे ?
- सेनेच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी नारायण राणेंना दिले जाणार मंत्रिपद ?
- राज्यपालांच्या नेमणुका करताना सोशल इंजिनिअरिंगवर मोदी सरकारकडून दिले जातेय विशेष लक्ष
- अत्याधिक आक्रमकता भाजपला नडली; १२ आमदारांच्या निलंबनाचा भविष्यात बसू शकतो फटका
- विधीमंडळाच्या कामकाजात राजदंड एवढा महत्वाचा का असतो?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
