Share

विधीमंडळाच्या कामकाजात राजदंड एवढा महत्वाचा का असतो?

Published On: 

मुंबई – पावसाळी अधिवेशनात दुसऱ्या दिवशी सुद्धा भाजपच्या आमदारांनी तुफान राडा घातला आहे. विधानभवनाच्या बाहेर भाजपकडून आंदोलन सुरू आहे. तर दुसरीकडे बडनेराचे आमदार रवी राणा यांनी विधानसभा अध्यक्षांच्या समोरील राजदंड पळवून नेण्याचा प्रयत्न केला आहे.

आमदार रवी राणा यांनी सभागृहात काळा बोर्ड घेऊन महाविकास आघाडी सरकार विरोधात घोषणाबाजी करत विधानसभा तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्याकडे धाव घेतली. त्यानंतर राजदंड घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी भास्कर जाधव आणि रवी राणा यांच्यामध्ये खडाजंगी झाली. मार्शलला बोलावून भास्कर जाधव यांनी रवी राणा यांना बाहेर काढण्याचे आदेश दिले.

राणा यांनी जो राजदंड पळवून नेण्याचा प्रयत्न केला त्या राजदंडाबाबत आज आपण जाणून घेणार आहोत सोबतच त्याचे महत्व देखील समजून घेणार आहोत. विधानसभेमध्ये अधिवेशनादरम्यान अध्यक्षांच्या आसनासमोर राजदंड ठेवला जातो. राजदंड हा सभागृहाचा सर्वोच्च सन्मान म्हणून ठेवण्यात येतो. विधानसभेप्रमाणे महानगरपालिकांच्या सभागृहाच्या बैठकीच्या वेळी ही राजदंड ठेवला जातो.

सभागृहामध्ये सर्वाधिक अधिकार हे अध्यक्षांकडे असतात. सभागृह सुरळीत सुरु ठेवण्याची जबाबदारी अध्यक्षांवर असते. पारंपारिक पद्धतीनुसार अध्यक्षांच्या आसनासमोर राजदंड ठेवला जातो. सभा संपेपर्यंत राजदंड तिथेच ठेवला जातो. राजदंड हा सभागृहातील सर्वोच्च सन्मानाचे प्रतिक असल्याने तो उचलून सभागृहाबाहेर नेल्यास सभागृहाचं कामकाज थांबवावं लागतं.

आपलं म्हणणं मांडण्यासाठी किंवा सभागृहाने ऐकून घ्यावं या हेतूने अथवा एकादा ठराव व निर्णय न पटल्यास सदस्य राजदंड पळवून सभागृहाबाहेर नेण्याचा प्रयत्न करतात. मात्र राजदंड उचलला तरी तो थेट सभागृहाबाहेर नेण्याची घटना फारच क्वचित होते. मात्र जर अशी घटना घडलीच तर याबाबत अनेक उलटसुलट चर्चा होतात आणि ज्या कारणासाठी राजदंड पळवण्यात आला त्या मुद्द्याची देखील सहाजिकच राज्यभर चर्चा होऊन या मुद्द्याकडे लक्ष वेधले जाते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!