पुणे : काल दसरा मेळाव्यानिमित्त झालेल्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. यानंतर आज भाजप नेत्यांकडून ठाकरेंना टार्गेट केले जात आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि उद्धव ठाकरे यांना चोख उत्तर दिले. यानंतर आता माजी आमदार आणि भाजप नेते जगदीश मुळीक यांनी देखील महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले आहे.
जगदीश मुळीक यांनी फडणवीसांनी केलेल्या आरोपाचे समर्थन केले. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणाले, ‘होय हे बेईमानीने सत्तेत आलेलं सरकार आहे.दगाफटका करून सत्तेत आलेलं नेते कधीच जनहिताचे काम करू शकत नाहीत ते फक्त ‘कट कमिशन वसुली आणि वल्गना करू शकतात’ ही महाविकास आघाडी नसून ‘महावसुली आघाडी’आहे. असे जगदीश मुळीक यावेळी म्हणाले.
तत्पूर्वी आज देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. त्यामध्ये त्यांनी अनेक आरोप हे सत्ताधारी पक्षावर केले आणि हे सरकार महराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार असल्याचे म्हटले असून हे सरकार हे बेईमानीने सत्तेवर आलेले आहे असं म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- खेळाडूंसाठी ठाकरे सरकारचा महत्वाचा निर्णय; शासन सेवेत 5 टक्के कोटा राखीव
- देशात कोळशाची टंचाई नाही, महाराष्ट्र सरकार ने दोषारोपण करू नये – रावसाहेब पाटील दानवे
- ‘अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांची बुधवारी आणखी एक पोलखोल करणार’
- ‘योगी आदित्यनाथ यांना लाज वाटली पाहिजे’, ओवैसींचा हल्लाबोल
- ‘नातेवाईकांचीही चौकशी, त्यांना त्रास देणे हे बरोबर नाही’, गृहमंत्री वळसे पाटलांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
