🕒 1 min read
नवी दिल्ली- राज्यातील वीज उत्पादन संकटास केन्द्र सरकारकडून कोळसा पुरवठा होत नसल्याचे कारण देऊन करण्यात येत असलेल्या आरोपात अजिबात सत्यता नाही. केन्द्र सरकारने राज्य सरकारला पावसाळा सुरू होण्यापूर्वीच आवश्यक कोळसा साठवणूकीचे नियोजन करण्याचे कळवले असताना राज्य सरकारने कोळशाची साठवणूक केली नाही आणि आता केन्द्र सरकारवर ठपका ठेवत आहेत, ही जनतेची दिशाभूल आहे असं केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी म्हटलं आहे.
दानवे म्हणाले, महाराष्ट्र राज्य सरकार कोणत्याही कारणासाठी केन्द्र सरकारवर आरोप करत सुटलेले असते मग ते करोना असो,अतिवृष्टी असो,शेतकऱ्यांचे नुकसान झाले, मराठा आरक्षण ,ओबीसी आरक्षण काही झाले की केन्द्र जवाबदार, असे बोलण्याचा त्यांना हा एकमेव छंद लागलेला आहे. देशातील सर्व राज्य सरकारकडून कोळशाची मागणी होते त्यानुसार पुरवठा करण्यात येतो आज आवश्यकतेनुसार भरपूर प्रमाणात कोळसा उपलब्ध असताना त्यांचे म्हणणे आहे की कोळसा नाही.देशात चाळीस लाख मेट्रिक टन कोळसा भांडारात उपलब्ध आहे कोळसा खाण केन्द्रावर सात लाख मेट्रिक टन कोळसा अतिरिक्त साठवलेला आहे.
भयंकर पाऊस झाल्यानंतर सुध्दा आमच्या अधिकार्यांनी व कामगारांनी रात्रंदिवस अतिशय जोखीम घेऊन सातत्याने मेहनतीने प्रयत्न करत काम करून पूर्वीपेक्षा अधिक प्रमाणात कोळशाचे उत्पादन केले आहे असे दानवे म्हणाले.महाराष्ट्र राज्याला, कोल इंडिया ने अनेक पत्र लिहून त्यांचा कोळश्याचा हिस्सा त्यांनी उचलावा असे वारंवार सांगितले होते. मात्र महाजनकोने त्या पत्राची दखल न घेता कोणत्याही प्रकारचे शेड्युल कोल इंडिया कडे पाठवले नाही .कोळशाचे योग्य नियोजन न केल्यामुळे महाराष्ट्रात हि परिस्थिती निर्माण झाली आहेपरदेशातून वीस टक्के कोळसा आपल्या देशात येतो तो महाग झाला आहे मात्र त्यापेक्षा अधिक कोळशाचे उत्पादन आपण केले आहे गतवर्षीच्या तुलनेत आपले उत्पादन वाढले आहे भारतात पर्याप्त कोळसा उपलब्ध आहे चिंता करण्याचे काही कारण नाही राज्य सरकारचे नियोजन फसले त्यांनी पावसाच्या पूर्वी आवश्यक साठा केलेला नाही असे दानवे यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- ठरलं तर मगं…राहुल द्रविड होणार टीम इंडियाचा कोच!
- ‘शरद पवार आजही कारखानदारांचेच, आम्ही त्यांचे गुलाम नाही’
- ‘अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांची बुधवारी आणखी एक पोलखोल करणार’
- ‘योगी आदित्यनाथ यांना लाज वाटली पाहिजे’, ओवैसींचा हल्लाबोल
- ‘नातेवाईकांचीही चौकशी, त्यांना त्रास देणे हे बरोबर नाही’, गृहमंत्री वळसे पाटलांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
