मुंबई : भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी नोकरभरतीच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारवर हल्ला चढवला आहे. सरकारी भरतींच्या परिक्षांमध्ये सावळा गोंधळ घालण्याची सवयच या सरकारला जडली आहे अशी टीका पडळकर यांनी केली आहे.
काही दिवसापुर्वीच आरोग्य विभागानं कोणतीही पुर्वसुचना न देता आपली परिक्षा रद्द केली होती. कोरोनाच्या संकटात, विद्यार्थी कसे तरी परीक्षा केंद्रावर पोहोचले होते त्यांना माघारी पाठवलं होतं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षाही यांनी सहा वेळा पुढं ढकलली होती. विद्यार्थी मानसिक तणावाखाली आहेत. याचं गांभीर्य सरकारला नाही असं पडळकर यांनी म्हटले आहे.
पडळकर पडळकर म्हणाले, प्रशासनात आणि सरकारमध्ये कसलाच ताळमेळ नाही. इतकं होऊन पुन्हा नव्या होणाऱ्या आरोग्य विभागाच्या परीक्षेच्या तारखेत गोंधळ घातलाय. एकाच दिवशी दोन परीक्षा दोन वेगवेगळ्या जिल्ह्यात ठेवल्यात. म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांचा परिक्षांना समोर जाण्याचा अधिकारच नाकारताय. त्यांची संधी नाकारताय.
एकतर हे वसुली सरकार नोकर भरती काढत नाही, काढली तर असा गोंधळ घालतं. सरकारच्या या गलथान कारभारामुळे स्वप्नील लोणकर सारख्या विद्यार्थ्याला जीव गमवावा लागला, पण या प्रस्थापितांचं सरकार निर्लज्जासारखं वावरतंय असा टोला देखील पडळकर यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- बुमराह-हर्षलला पछाडत शार्दूल ठाकूर बनला यूएईचा ‘किंग’
- देशात कोळशाची टंचाई नाही, महाराष्ट्र सरकार ने दोषारोपण करू नये – रावसाहेब पाटील दानवे
- ‘मुख्यमंत्री साहेब, राज्यातील विद्यार्थ्यांच्या वडिलांच्या स्वप्नांचा पण विचार करा ना’
- ‘दगाफटका करून सत्तेत आलेल नेते कधीच जनहिताचे काम करू शकत नाहीत’
- ‘नातेवाईकांचीही चौकशी, त्यांना त्रास देणे हे बरोबर नाही’, गृहमंत्री वळसे पाटलांची प्रतिक्रिया


