मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यानिमित्तच्या भाषणावर विरोधकांनी निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही या भाषणातल्या काही मुद्द्यांवर टीका केली आहे. भाषणादरम्यान मुख्यमंत्री ठाकरे यांनी सोमय्या यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. यावरच आता सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच यावेळी त्यांनी पवार कुटुंबियांवर देखील टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधतांना ते म्हणाले की, अजित पवार, सुनेत्रा पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे, पार्थ पवार, रोहित पवार आणि आता त्यांना ठाकरे सरकारमध्ये एक नवीन माफिया साथीदार सापडला आहे तो म्हणजे उद्धव ठाकरे. आता हे पहिला हल्ला सुरू करणार सीबीआय, ईडी, इनकम टॅक्स सगळ्यांना टार्गेट करणार, आमच्या बायका-मुलांवर कारवाई होतेय, मोदी घडवून आणतायत हे सगळ बोलणार. त्यावेळी समाजातले कार्यकर्ते जे ह्यांचेच पीआर यंत्रणा आहेत तेही आपले काम सुरू करणार. पण राज्याच्या आणि केंद्रीय तपास यंत्रणांमध्येही काही चांगले अधिकारी आहेत. आणि न्यायालय ही साडेबारा कोटी जनतेच्या बाजूने उभे राहणार’,
दरम्यान, पुढे ते ठाकरेंच्या ‘कोणाच्याही बायका-मुलांवर आरोप करणं हा अक्करमाशीपणा आहे’, या वक्तव्यावर टीका करत म्हणाले की,’मी ठाकरेंच्या विधानाशी एकदम सहमत आहे. कोणीही खोटे आरोप केलेले योग्य नाही. पण जर उद्धव ठाकरे आपल्या बायकोच्या रश्मी उद्धव ठाकरेंच्या नावाने घोटाळा करत असेल तर साडेबारा कोटी जनता जाब विचारणार. मुख्यमंत्री लुटमार करतात. उपमुख्यमंत्री तर अरे बापरे! अजित पवारांनी विधान केलं होतं, माझ्या बहिणीच्या घरी का इनकम टॅक्सवाले गेले? किरीट सोमय्यांनी सगळी कागदपत्रं ठेवली ना? तर बायकोच्या नावाने, बहिणीच्या नावाने बेनामी व्यवहार करणं हे त्याहीपेक्षा मोठ पाप आहे. मग तो मुख्यमंत्री असो, उपमुख्यमंत्री असो. ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्र्यांचा मुलगा त्या बिल्डरसोबत संचालक होता, किरीट सोमय्याने कागदपत्रं ठेवली ना? मग का पार्टनरशीप मागे घेतली? म्हणून महापालिकेच्या माफिया कॉन्ट्रॅकरकडून पार्टनरशीपचा मिळालेला पैसा बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून गुंतवणार असाल तर त्याचा जाब मुख्यमंत्र्यांना द्यावा लागणार,’ असेही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- बुमराह-हर्षलला पछाडत शार्दूल ठाकूर बनला यूएईचा ‘किंग’
- देशात कोळशाची टंचाई नाही, महाराष्ट्र सरकार ने दोषारोपण करू नये – रावसाहेब पाटील दानवे
- एकतर हे वसुली सरकार नोकर भरती काढत नाही, काढली तर गोंधळ घालतं – पडळकर
- ‘दगाफटका करून सत्तेत आलेल नेते कधीच जनहिताचे काम करू शकत नाहीत’
- ‘नातेवाईकांचीही चौकशी, त्यांना त्रास देणे हे बरोबर नाही’, गृहमंत्री वळसे पाटलांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

