Share

पूर्ववैमनस्यातून मित्रानेच काढला मित्राचा काटा

Published On: 

औरंगाबाद : पूर्ववैमनस्यातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना, हडको जवळील बिकानेर मिठाई दुकानाजवळ शनिवारी रात्री घडली. यश सोमेश महेंद्रकर वय २१ रा. एसबीओए शाळेच्या पाठीमागे, असे मयताचे नाव असून राज नामदेव जाधव असे संशयित आरोपीचे नाव आहे.

जळगावरोड हडको येथील बिकानेर मिठाईच्या दुकानाजवळ यश आणि राजचा मित्र श्रीकांत शिकरे बसलेला होता. त्याठिकाणी राज आणि त्याचे काही मित्र आले. राजने श्रीकांतला सांगितले कि, आज मी यशला नाही सोडणार. याचे श्रीकांतने कारण विचारल्यावर यशने शिवीगाळ केल्याचे सांगितले. त्यावर श्रीकांत ने राजला समजवून सांगण्याचा प्रयत्न केला.

परंतु, राज ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता, राजने यशला फोन करून तुळजा भवानी चौकापाशी बोलावून घेतले. त्यानंतर काही वेळात यश आणि त्याचे दोन मित्र विशाल, प्रफुल सोबत त्या ठिकाणी आला. त्याला पाहून राज जाधव यशला मारण्यासाठी धावून घेला. त्यावेळी त्याच्या हातात चाकू होता, त्याला श्रीकांतने मित्रांच्या सहायाने बाजूला केले.

परंतु, राज ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने तो पुन्हा यशला मारण्यासाठी धावून गेला आणि यशवर चाकूने वार केले. त्यात यश जखमी झाला, त्याला जखमी अवस्थेत मित्रांनी जवळच असलेल्या खाजगी रुग्णालयात नेले. परंतु, रुग्णालयात जागा नसल्याने त्यांनी घाटीतील अपघात विभागात नेले. तिथे डॉक्टरांनी यशला तपासून मयत घोषित केले.

हि, घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरली, घटनास्थळी पोलीस, फोरेन्सिकचे पथक दाखल झाले. पोलिसांनी रात्री उशिरा राज नामदेव जाधवला ताब्यात घेऊन अटक केली. या प्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.

महत्त्वाच्या बातम्या     

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!