Share

Rohit Pawar | “जनता सोबत असली तर किल्ला अभेद्य राहतो”; रोहित पवार यांची ‘ती’ पोस्ट चर्चेत

Published On: 

मुंबई : ५ ऑक्टोबर रोजी मुंबईत शिवतीर्थ मैदानावर उद्धव ठाकरे गटाचा दसरा मेळावा तर बीकेसी मैदानावर एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडला. मेळाव्यादरम्यान दोन्ही गटांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडली नाही. ठाकरे आणि शिंदे गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शनही करण्यात आले. खरी शिवसेना कुणाची यावर जनता आपल्या उपस्थितीने उत्तर देणार असल्याचं म्हंटल जात होत. या संदर्भात रोहित पवार यांनी भाष्य केलं आहे. “जनता सोबत असली तर किल्ला मात्र अभेद्य राहतो” असं म्हणत त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.

“मुंबईचा बालेकिल्ला ढासळत असल्याची चर्चा मी ऐकली होती, पदाधिकारी गेल्याने एखाद- दुसरा बुरुज ढासळू शकतो, परंतु सामान्य कार्यकर्ते, जनता सोबत असली तर किल्ला मात्र अभेद्य राहतो याची प्रचीती कालच्या गर्दीने दिली आणि शेवटी निष्ठा जिंकली” असं म्हणत रोहित पवारांनी शिंदे गटाला चिमटा काढला आहे.

रोहित पवार म्हणाले, “कालच्या दोन्ही सभा बघितल्या, लोकांमध्ये उत्साह- निष्ठा बळजबरीने किंवा अन्य मार्गांनी आणता येत नाही, माणसं स्वयंस्फूर्तीने आली तरच उत्साह शेवटपर्यंत टिकतो आणि निष्ठा दिसते हेच पुन्हा अधोरेखित झालं. मुंबईचा बालेकिल्ला ढासळत असल्याची चर्चा मी ऐकली होती, पदाधिकारी गेल्याने एखाद- दुसरा बुरुज ढासळू शकतो, परंतु सामान्य कार्यकर्ते, जनता सोबत असली तर किल्ला मात्र अभेद्य राहतो याची प्रचीती कालच्या गर्दीने दिली आणि शेवटी निष्ठा जिंकली.” अशा आशयाची पोस्ट रोहित पवार यांनी केली आहे. 

दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कालच्या दसरा मेळाव्या संदर्भांत प्रतिक्रिया दिली आहे. काल एकनाथ शिंदेंचं (Eknath Shinde) तसेच उद्धव ठाकरेंचं (Uddhav Thackeray) काय मार्गदर्शन झालं हे आपण सर्वांनीच पाहिलेलं आहे, मी देखील पाहिलेलं आहे. त्यांनी-त्यांनी त्यांचे विचार सगळ्यांसमोर ठेवले, दोन्ही कडे गर्दी होती, कशी होती हे देखील सर्वांना माहिती आहे, मिडीयाने लोकांना अनेक प्रश्न विचारले तेव्हा शिंदेंच्या मेळाव्याला जाणाऱ्यांना माहितंचं नव्हते की ते कुठे चाललेत, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!