Share

Nilesh Rane | “काल उद्धव ठाकरे यांची बायको आणि दोन शेंबडी पोरं सोडली तर…”, निलेश राणेंचा घणाघात

Published On: 

मुंबई : संपुर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलेला दसरा मेळावा अखेर काल पार पडला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी दोन वेगळ्या ठिकाणी दसरा मेळावे आयोजित केले होते. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्याच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं. अशातच कालच्या दसरा मेळाव्यावरुन निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

निलेश राणे यांचा टोला –

काल उद्धव ठाकरे यांची बायको आणि दोन शेंबडी पोरं सोडली तर अख्ख बाळासाहेबांचं कुटुंब थापा सहित शिंदे साहेबांच्या व्यासपीठावर होतं. या माणसाचा ना राजकारणात ना याच्या कुटुंबाला उपयोग, एक दिवस बाळासाहेबांचे नाव लावू नकोस आणि मग तुझी औकात बघ, असं निलेश राणे यांनी ट्विट करत म्हटलं आहे.

निलेश राणे यांचं ट्विट –

नितेश राणे यांनी साधला निशाणा – 

नितेश राणे यांनी देखील आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करत ट्विट केलं आहे. दुसऱ्यांची मुलं कार्टी..लहान नातवंडांना पण नावं ठेवणार, यांचा penguin कार्टा..nightlife च्या नावाने सगळी कडे Ranjeet बनून फिरतो तेच काय.. मग Disha Salian बद्दल पण बोला, 8 June च्या पार्टी मधे आणलेली लहान मुलं पण कुणाची नातवंड होती?? तेही तुमच्या आदित्य कार्ट्या ला विचारा जरा.., असा टोला नितेश राणेंनी लगावला आहे.

नितेश राणे यांचं ट्विट –

राहुल शेवाळेंचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल –

काल झालेल्या मेळाव्यामध्ये राहुल शेवाळेंनी देखील आदित्य ठाकरेंवर घणाघात केला होता. बाबा रुग्णालयात असताना पक्ष फोडला, जाण्याचे कारस्थान रचले जात होते, असा आरोप आदित्य ठाकरेंनी आमच्यावर केले होते, असं शेवाळे म्हणाले. तसेच जेव्हा उद्धव ठाकरे रुग्णालयात होते, तेव्हा टीका करणारे स्वत: (आदित्य ठाकरे) स्विझर्लंड येथे व्यापारी परिषदेला गेले होते. त्यांचा विभाग नसताना ते गेले होते. जेव्हा जून महिना यायचा तेव्हा ठाकरे इंग्लंडला जायचे. आम्ही इथे नालेसफाईच्या कामांचा आढावा घेत असायचो, असं देखील त्यांनी सांगितलं आहे.

उद्धव ठाकरे कडाडले –

कोंबडीचोरावर, बाप चोरांवर या मेळाव्यावर जास्त बोलायचं नाही. या व्यासपीठाला एक अर्थ आहे, पावित्र्य आहे. ही सगळी लोकं आपल्यासाठी आले आहेत. शिव्या देणं खूप सोपं असतं, पण विचार देणं फार कठीण असतं. मी ती परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न करतो असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नारायण राणे आणि एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!