मुंबई: मिस युनिव्हर्स ते बॉलीवूड आणि बॉलीवूड पासून ओटीटी पर्यंत प्रवास करणाऱ्या सुष्मिता सेनने डिज्नी प्लस हॉटस्टार वरील ‘आर्या’ या वेब सिरीजच्या माध्यमातून अभिनयाच्या दुनियेत पुनरागमन केले आहे. आर्याच्या दमदार परफॉर्मन्स नंतर सुष्मिताचे चाहते आता तिच्या नवीन वेब सिरीजची आतुरतेने वाट बघत आहे. चाहत्यांची प्रतीक्षा आता लवकरच संपणार असून सुष्मिता सेन ने आपल्या नवीन वेब सिरीजचा पहिला लुक रिव्हील केला आहे. सुष्मिता चा हा लूक पाहून असे लक्षात येते की, ती या नवीन वेब सिरीज मध्ये ट्रान्सजेंडर (किन्नर) ची भूमिका पार पाडणार आहे.
सुष्मिता सेन चा आश्चर्यचकित करणारा लुक
मीडिया रिपोर्टनुसार, सुष्मिता सेन ‘ताली’ या वेब सिरीज मध्ये सुप्रसिद्ध ट्रांसजेंडर (किन्नर) गौरी सावंत यांची भूमिका साकारणार आहे. या वेब सिरीजच्या माध्यमातून सुष्मिता गौरी सावंत यांचे आयुष्य जगासमोर आणणार आहे. गौरी सावंत या एक सामाजिक कार्यकर्त्या असून त्यांनी ट्रांसजेंडर समुदायाला समाजात आदर आणि सन्मान मिळवून देण्यासाठी काम केले आहे.
ताली-बजाऊँगी नहीं, बजवाऊँगी!
सुष्मिता सेनने तिच्या येणाऱ्या ताली वेब सिरीज मधील पहिला लुक इंस्टाग्राम वर शेअर केला आहे. ताली – बजाऊँगी नहीं, बजवाऊँगी! या कॅप्शन सह तिने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ताली वेब सिरीज ची ऑफर सुष्मिताला दिल्यावर तिने लगेच होकार दिला होता. कारण तिला गौरी सावंत पात्र खूप आवडले आहे अशी बातमी समोर येत आहे. गौरी सावंत या ‘सखी चार चौघी’ ट्रस्टच्या संस्थापक आणि संचालिका आहेत. त्यांनी 2000 मध्ये ट्रान्सजेंडर साठी आणि सुरक्षित लैंगिक संबंधाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी ही संस्था सुरू केली होती.
सुष्मिता सेन लवकरच ताली वेब सिरीजच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. तालीचे शूटिंग पूर्ण केल्यानंतर सुष्मिता तिच्या लोकप्रिय वेब सिरीज आर्याच्या सीजन 3 वर काम सुरू करणार आहे, अशी बातमी समोर आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- Nilesh Rane | “काल उद्धव ठाकरे यांची बायको आणि दोन शेंबडी पोरं सोडली तर…”, निलेश राणेंचा घणाघात
- Devendra Fadanvis | “ठाकरेंनी स्क्रिप्ट राईटर बदलावा”; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरेंवर निशाणा
- Upcoming Car Launch | Tata सफारी इलेक्ट्रिक कार होणार लवकरच लाँच
- Nitesh Rane | “तुमच्या आदित्य कार्ट्याला विचारा जरा..”, नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा
- BJP | ‘बापाच्या नावाने थापा’; ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर भाजपचा पलटवार


