मुंबई : इंग्लंड दौऱ्यातील भारतीय संघाला प्रतिस्पर्धी संघापेक्षा एका गोष्टीने जास्त त्रास दिला आहे. ती गोष्ट म्हणजे इंग्लंडमधील हवामान. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत दुसऱ्या आणि पाचव्या दिवशी पावसाने हजेरी लावली होती. परिणामी सामना अनिर्णीत अवस्थेत संपला.
पहिल्या कसोटी सामन्याच्या अखेरच्या दिवशी भारताला १५७ धावांची गरज होती. तर भारताचे ९ गडी शिल्लक होते. मात्र अखेरच्या दिवशी पावसामुळे खेळ होऊ शकला नाही. त्यामुळे सामना अनिर्णीत झाला. आता दुसरी कसोटी लॉर्ड्स येथे १२ ऑगस्टपासुन सुरु होणार आहे. सामना सुरु होण्यापुर्वी लॉर्ड्सवरील हवामानाबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. हवामनाच्या आदांजानुसार लॉर्ड्स येथील वातावरण ढगाळ असणार आहे. मात्र पावसाची शक्यता कमी आहे. असे लॉर्ड्स येथील स्थानिक हवामान खात्याने सांगितले आहे.
सामन्याच्या पहिल्या दिवशी तामपान २३ डिग्री सेल्सियस असेल. यादिवशी पावसाची शक्यता कमी आहे. दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवसाप्रमाणेच वातावरण राहील पण ढगाळ वातावरण असणार आहे. तर तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी थोडीशी गरमी असल्यामुळे वातावरण चांगले राहणार आहे. तसेच अखेरच्या दिवशी १६ ऑगस्ट रोजी पावसाची शक्यता नसल्याचे सांगण्यात आले आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ सोमवारीच लंडला पोहोचला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रात आज ५,६०९ नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर…
- ‘अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्थानासाठी समिती गठित करणार’- वर्षा गायकवाड
- ‘MPSC आयोगामध्ये ठराविक एका जातीच्याच लोकांची नियुक्ती’; प्रीतम मुंडे लोकसभेत कडाडल्या
- ठरलं ! 17 ऑगस्टपासून राज्यातील ‘या’ इयत्तेचे वर्ग भरणार
- नांदेड विभागातून तीनशेवी किसान रेल्वे सुसाट; महसूलात कोटींनी वाढ!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

