मुंबई: सध्या ‘मुलगी झाली हो’ या स्टार प्रवाहवरील मालिका आणि अभिनेता किरण माने चर्चेत असलेले प्रकरण आहे. दोन दिवसांपूर्वी राजकीय भूमिका मांडल्यामुळे किरण माने (Actor Kiran Mane)यांना मालिकेतून काढण्यात आल्याचे त्यांनी म्हटले. माने यांच्या लिखाणशैलीमुळे यापूर्वीही अनेक चर्चा झाल्या आहेत. मात्र यावेळी त्यांनी केलेली एक पोस्ट चांगलीच गाजली. स्टार प्रवाहच्या भूमिकेवर राजकीय क्षेत्रातील नेत्यांनीही टीका केली आहे. आता असे असतानाच स्टार प्रवाहने या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
स्टार प्रवाह वाहिनीने यासंदर्भात परिपत्रक जारी करत म्हटले आहे की, ”किरण माने यांनी लावलेले आरोप बिनबुडाचे आणि काल्पनिक आहेत. असे आरोप होणे ही दुर्दैवी बाब आहे. माने यांना मालिकेमधून काढून टाकण्याचा निर्णय मालिकेमधील अनेक सह-कलाकारांसह, विशेषतः, महिला नायिकांशी केलेल्या गैरवर्तनामुळे घेण्यात आला. त्यांच्या सहकलाकार, दिग्दर्शक आणि शोच्या इतर युनिट सदस्यांनी त्यांच्या सततच्या अनादरपूर्ण आणि आक्षेपार्ह वागणुकीविरुद्ध अनेक तक्रारी केल्या होत्या. माने यांना अनेक वेळा ताकीद देऊनही त्यांनी शालीनता आणि शिष्टाचाराचा भंग करत त्याच पद्धतीने वागणे सुरू ठेवले. त्यामुळे त्यांना मालिकेमधून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.” असे स्टार प्रवाहने म्हटले आहे.
तसेच “आम्ही सर्व मतांचा आणि मतांचा आदर करतो. प्रत्येक व्यक्तीला त्यांचे मत मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. दरम्यान, आम्ही आमच्या कलाकारांसाठी विशेषतः महिलांसाठी सुरक्षित आणि निरोगी वातावरण सुनिश्चित करण्यासाठीही तितकेच वचनबद्ध आहोत.” असेही स्टार प्रवाहने म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी परवानगी कशाला हवी? नवनीत राणांचा हल्लाबोल
‘दुगाण्या झाडायला काय अक्कल लागते?’; उद्धव ठाकरेंचा विरोधकांना टोला
औरंगाबाद प्राणीसंग्रहालयात बछड्यांसाठी जागा नाही; म्हणे आता प्रजननच रोखा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

