🕒 1 min read
औरंगाबाद : तालुक्यातील बालानगर येथे बोगस डॉक्टरवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तालुका आरोग्य आधिकारी डॉ.भुषण आगाझ व बातमी घेण्यासाठी गेलेले पत्रकार मोसिन शेख यांच्यावर बोगस डॉक्टरांसह ग्रामस्थांनी हल्ला चढवल्याची घटना बुधवारी दि.१९ घडली असून पोलिसांनी बचाव केल्याने आरोग्य अधिकारी बचावले आहे.
आरोग्य विभागाचे पथक बुधवारी बालानगर येथे कारवाईसाठी गेले असता गावातील बोगस डॉक्टर व त्याच्या पाच सहका-यांनी तालुका आरोग्य आधिकारी डॉ. भुषण आगाझसह डॉ. युसुफ मनीयार व आरोग्य विभागाच्या पथकाला धक्काबुक्की करुन हल्ला चढवला.
प्रसंग अचानक उद्दभवल्याने तालुका आरोग्य आधिका-यांसह त्यांचे पथक भांबावून गेले अश्यात वेळेवर पोलिसांची ईंट्री झाल्याने डॉक्टर थोडक्यात बचावले, दरम्यान दुपारी या प्रकरणी बालानगरचे वैद्यकीय आधिकारी डॉ. युसुफ मनीयार यांच्या फिर्यादिवरुन डॉ. अरबिंदो विश्वास याच्यासह भगवान खंडु गोर्डे, शिवाजी गोर्डे, रवी भुजबळ, आसिफ अब्बास शेख व अन्य सर्व रा. बालानगर. यांच्या विरोधात विविध कलमान्वये पैठण औद्यगीक वसाहत पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- उस्मानाबादेत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट मात्र मृत्युदर कायम
- अखेर ‘त्या’ वादावर पडदा ; जयंत पाटलांच्या प्रकल्पांना मंजूरी
- पंतप्रधान मोदी उद्या महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांतील कोरोनाचा आढावा घेणार
- पुलाखाली आढळला युवकाचा मृतदेह; बोरगावात एकच खळबळ
- बीसीसीआयच्या महिला आणि पुरुष संघातील भेदभावावर हरमनप्रितने टाकला पडदा, दिले ‘हे’ उत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
