मुंबई : आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यानंतर सर्व क्रिकेट रसिकांचे लक्ष हे जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्याकडे लागले आहे. या सामन्यात भारत आणि न्युझीलंड हे दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे आहेत. इंग्लंडमधील साउथहॅम्पटन येथे १८ ते २२ जुन दरम्यान हा सामना होणार आहे.
भारतीय क्रिकेट संघालामोठा दिलासा मिळाला आहे. इंग्लंड दौऱ्यापूर्वी संघातील दोन दिग्गजांनी कोरोनाविरुद्ध लढ्यात जिंकले आहेत. अनुभवी फिरकीपटू अमित मिश्रा आणि वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा यांनी कोरोनाला हरवलं आहे. बुधवारी अमित मिश्राची कोरोना चाचणी निगेटीव्ह आल्याची माहिती त्याने स्वत: सोशल मीडियावरुन दिली तर प्रसिद्ध कृष्णाच्या कोरोना चाचणीबाबत पीटीआयने वृत्त दिलं.
राज्य आणि देशात कोरनाच्या संसर्गाने गेल्या काही आठवड्यापासून पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. यादरम्यान भारतात सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव केल्याने बीसीसीआयने तत्काळ स्पर्धा अनिश्चीत काळासाठी स्थगित केली. यादरम्यान स्पर्धेतील काही भारतीय आणि विदेशी खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे हि स्पर्धा तात्काळ स्थगित करण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या
- तौक्ते वादळग्रस्तांना भरीव मदत द्या; फडणवीसांची रायगड जिल्ह्यातील पाहणीनंतर मागणी
- थेरगावात चोरट्यांचा धुमाकुळ! घरांचे बाहेरहून कडी-कोंडे लावत एकाच वेळी अनेक घरांतून लुटला लाखोंचा ऐवज
- खतांच्या किंमतीत घट पण शेतकऱ्यांच्या ‘या’ मागणीसाठी प्रहारच टाली थाली आंदोलन होणारच – कडू
- बोगस डॉक्टरांवर कारवाईसाठी गेलेल्या तालुका आरोग्य अधिकाऱ्यांसह पथकावर हल्ला
- संकट काही थांबेना ; तौक्ते चक्रीवादळानंतर देशात धडकणार आता नवे ‘यास’ वादळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

