Share

तौक्ते वादळग्रस्तांना भरीव मदत द्या; फडणवीसांची रायगड जिल्ह्यातील पाहणीनंतर मागणी

Published On: 

रायगड : तौक्ते चक्रीवादळामुळे कोकणाचे मोठे नुकसान झाले आहे. निसर्ग चक्रीवादळाची मदत अजून मिळालेली नाही. कोरोना आणि सातत्याचे लॉकडाऊन आणि आता तौक्ते चक्रीवादळाचा फटका, यामुळे या भागातील नागरिक मोठया संकटात सापडला आहे. त्यामुळे भरीव मदत कोकणाला करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.

कोकणाच्या दौऱ्यातील आज पहिल्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी रायगड जिल्ह्यात दौरा केला. प्रारंभी अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयात भेट देत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, आ. प्रशांत ठाकूर, आ. महेश बालदी हे यावेळी उपस्थित होते.

रायगड जिल्ह्यात सुमारे 8 ते 10 हजार घरांचे नुकसान, 5000 हेक्टरपर्यंत फळपीकांचे नुकसान, 200 शाळांचे नुकसान, 25 रूग्णालये किंवा आरोग्य उपकेंद्रांचे नुकसान, 600 गावांमध्ये वीजेचे नुकसान झाले असून 172 गावांमधील 70 हजार घरांमध्ये अजूनही वीज नाही. सुमारे 300 ते 400 उच्चदाब पोल्सचे नुकसान झालेले आहे. आता पंचनामे लवकर आणि वेळेत पूर्ण व्हावेत. बोटींचेही नुकसान मोठे झाले आहे, त्यामुळे मासेमारांना सुद्धा तत्काळ मदत देण्याची गरज आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

या भागातील नागरिकांना गेल्यावर्षीच्या निसर्ग चक्रीवादळाचे पैसे अजून मिळाले नाहीत. राज्य सरकारच्या वतीने मोठ्या घोषणा झाल्या, पण, अजूनही त्याची पूर्तता नाही. निसर्ग चक्रीवादळ, कोरोना-लॉकडाऊन आणि आता हे संकट, असे एकापाठोपाठ तीन धक्के बसले आहेत. केवळ काही जिल्ह्यांचा प्रश्न असल्याने भरघोस मदत राज्य सरकारने करावी, अशी आमची अपेक्षा आहे, असेही देवेेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

अलिबाग बंदर येथे बोटींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खानाव, उसर आणि वावे या ठिकाणी वादळामुळे झालेल्या नुकसानीची सुद्धा त्यांनी आज पाहणी केली. रोहा तालुक्यातील मेढा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे सुद्धा मोठे नुकसान झाले आहे. आज कोरोनाच्या काळात आरोग्य सेवांमध्ये खंड पडणे अजिबात परवडणारे नाही. त्यामुळे या केंद्राच्या उभारणीसाठी तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. या आरोग्य केंद्राचे असेच नुकसान निसर्ग चक्रीवादळाच्यावेळी पण झाले आणि आता पुन्हा नव्याने झालेल्या बांधकामाला तौक्ते वादळाचा फटका बसला. वारंवार येणारी वादळे पाहता आता अशा इमारतींची संरचनाच बदलण्याबाबतचा निर्णय राज्य सरकारने घेतला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!